शिवाजी पार्कवरील ग्रीलवरून शिवसेना-मनसे "आमने-सामने'

शिवाजी पार्कवरून शिवसेना-मनसे पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. वीर सावरकर मार्गाच्या पदपथावरील जुने ग्रील काढून नवे ग्रील बसवले जात आहेत; मात्र जुने स्टेनलेस स्टीलचे ग्रील सुस्थितीत असताना लोखंडी ग्रील बसवले जात असून, ही पैशांची लूट आहे, असा आरोप मनसेने केला.
MNS Sandeep Deshpande Objects Vishakha Rauts Railing Proposal
MNS Sandeep Deshpande Objects Vishakha Rauts Railing Proposal

मुंबई  : शिवाजी पार्कवरून शिवसेना-मनसे पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. वीर सावरकर मार्गाच्या पदपथावरील जुने ग्रील काढून नवे ग्रील बसवले जात आहेत; मात्र जुने स्टेनलेस स्टीलचे ग्रील सुस्थितीत असताना लोखंडी ग्रील बसवले जात असून, ही पैशांची लूट आहे, असा आरोप मनसेने केला.

शिवाजी पार्क येथील वीर सावरकर मार्गाच्या पदपथावर पाच-सहा वर्षांपूर्वी मनसेचे तत्कालीन नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या विकास निधीतून स्टेनलेस स्टीलचे ग्रील्स बसविण्यात आले होते. आता हे जुने ग्रील काढून त्या ठिकाणी नवे ग्रील बसवले जाणार आहेत. शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका, महापालिकेतील सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्या विकासनिधीतून हे काम सुरू आहे. यावर देशपांडे यांनी आक्षेप घेतला. 

जुने स्टेनलेस स्टीलचे ग्रील आजही मजबूत आहेत. त्या ठिकाणी तकलादू लोखंडाचे ग्रील्स बसवले जाणार आहेत, असा आरोपही त्यांनी केला. हा कंत्राटदाराचे पोट भरण्याचा प्रकार असल्याचा आरोपही देशपांडे यांनी केला. याबाबत विशाखा राऊत यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. शिवाजी पार्क आणि दादर परिसरातील विविध मुद्द्यांवरून शिवसेना आणि मनसे यापूर्वी एकमेकांना भिडली आहे. त्यात आता नव्या मुद्द्याची भर पडली आहे.
Edited By- Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com