मनसेने केली शिवसेनेची वीरप्पनशी तुलना

विक्रोळीचे शिवसेना नगरसेवक स्थानिक फेरीवाल्यांकडून रोज पैसे गोळा करत असल्याचा प्रकार मनसेने उघडकीस आणला असून यावरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली आहे
MNS Leader Sandeep Deshpande Compared Shivsena with Virappan
MNS Leader Sandeep Deshpande Compared Shivsena with Virappan

मुंबई : विक्रोळीचे शिवसेना नगरसेवक स्थानिक फेरीवाल्यांकडून रोज पैसे गोळा करत असल्याचा प्रकार मनसेने उघडकीस आणला असून यावरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली आहे. वीरप्पनने देशाला जेवढे लुटले नसेल, तेवढे मुंबई मनपाच्या सत्ताधाऱ्यांनी लुटलंय असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि विक्रोळी येथील मनसे विभाग प्रमुख शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत विक्रोळी कन्नमवार नगर येथे शिवसेना पक्षाचे नगरसेवक हे स्थानिक फेरीवाल्याकडुन दररोज दहा रुपये गोळा करतात, असे पत्रकारांना सांगितले. या पावतीवर (स्व.) बाळासाहेब ठाकरे तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोटो असून पैसे गोळा करताना स्थानिक नगरसेवक व कार्यकर्ते हे पैसे महानगरपालिका व पोलिसांसाठी आहेत, असे सांगत असल्याचा आरोप या दोन्ही नेत्यांनी केला.

हा प्रकार करणाऱ्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी संदीप देशपांडे यांनी यावेळी केली आहे. ''चंदनचोर वीरप्पनने देशाला जेव्हढे लुटले नसेल तितकं मुंबई मनपाला सत्ताधाऱ्यांनी लुटले आहे. महानगरपालिकेने हॉकर्स झोन सुरू करायचे ठरवले. आता रस्त्यावरच्या फेरीवाल्यांकडून कडून खंडणी वसुल करायचं काम शिवसेना करते आहे,'' बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे फोटो लावून वसूली केली जाते आहे. मुख्यमंत्र्यांना यातला कट (हिस्सा) पोहोचतोय का?, असा सवाल देशपांडे यांनी केला. पावतीवर नगरसेवकांचा फोटो आहे. त्याशिवाय (स्व.) बाळासाहेबांचा फोटोही आहे.शिवसेनेला बाळासाहेबांचा फोटो अशाप्रकारे खंडणी वसूल करण्यासाठी  वापरण्याचा कोणताही अधिकार नाही,'' असेही देशपांडे म्हणाले. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com