मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही : शिवसेना नेते अनिल परबांचा हल्लाबोल 

आजवर वेगवेगळ्या पक्षाची सुपारी घेऊन झाली आहे.
MNS can't work without taking betel nut: Shiv Sena leader Anil Parba's attack
MNS can't work without taking betel nut: Shiv Sena leader Anil Parba's attack

मुंबई : "महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सुपारी घेतल्याशिवाय काम करू शकत नाही, त्यामुळे त्यांना कोणाची तरी सुपारी घ्यावीच लागेल. कारण त्यांच्या पक्षाचं अस्तित्वाचं त्यावर आहे. आज ना उद्या त्यांना कोणाची तरी सुपारी घ्यावीच लागणार आहे. आजवर वेगवेगळ्या पक्षाची सुपारी घेऊन झाली आहे,' अशा शब्दांत राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी मनसेवर हल्लाबोल केला. 

परिवहन मंत्री परब हे मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. त्या वेळी त्यांनी मनसेवर सडकून टीका केली. मनसे-भाजपच्या संभाव्य युतीबाबत ते म्हणाले की, "ज्या भाजपच्या नेत्यांना मागील लोकसभा निवडणुकीत "लाव रे तो व्हिडिओ' असे म्हणत नागडे-उघडे केले. आता नागड्याबरोबर उघडा झोपला तर काय परिस्थिती होते, हे कदाचित पुढील काळात दिसून येईल.' 

मुंबई महापलिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सध्या जे काही चालले आहे, ही वेगवेळी जरी समीकरणे असली तरी मुंबई महापालिका किंवा इतर निवडणुका असो, त्या आम्ही समर्थपणे लढू आणि आम्हाला विश्‍वास आहे की त्या आम्ही नक्कीच जिंकू, असा दावाही परिवहन मंत्र्यांनी या वेळी बोलताना केला. 

वाढीव विजबिलाबाबत येत्या 26 नोव्हेंबर रोजी मनसेचा मोर्चा काढणार आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, त्यामुळे मोर्चांना पोलिस परवानगी नाकारत आहेत, ठाण्यात तशा हालचाली सुरू आहेत. या प्रश्‍नावर परब म्हणाले की, "आतापर्यंत सरकारने कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी दिलेली नाही, त्यामुळे सरकार नक्कीच मोर्चाच्या बाबत काय करायचे, याचा निर्णय घेईल.' 

महाविकास आघाडी महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढवणार का? या प्रश्‍नाला उत्तर देताना परब यांनी नमूद केले की, निवडणुका कशा लढवल्या जातील, हे पक्षाचे नेतृत्व ठरवेल. पण, मुंबईत शिवसेनेला निवडणुकीची वेगळी तयारी करावी लागते, असे मला वाटत नाही. कारण, शिवसेना हा काही निवडणुकीसाठी जन्माला आलेला पक्ष नाही. शिवसेना 365 दिवस काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे ही तयारी कायम चालूच असते. त्यामुळे वेगळी तयारी करावी लागेल, असे मला वाटत नाही. दररोज आम्ही लोकांची काम करत असतो, लोक शाखेत येऊन काम करून घेत असतात. 

राज्यातील महापलिका निवडणुकीतील आघाडीबाबतचा निर्णय शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रित येऊन घेतील, असेही शिवसेना नेते अनिल परब यांनी शेवटी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com