आमदार ठाकूरांच्या प्रयत्नांना यश; फ्रान्समधील जहाजावर अडकलेले २०० भारतीय सोमवारी परतणार 

कोरोनामुळे देश विदेशांतील भारतीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. परदेशात अडकलेल्या भारतीयांना याचा सर्वात जास्त फटका बसला आहे. फ्रान्सधील एका जहाजावर कर्मचारी म्हणून कामाला असलेले २०० भारतीय अखेर १४० दिवसांनंतर भारतात परतणार आहेत.
MLA Thakur's efforts succeed; 200 Indians stranded on ship in France will return on Monday
MLA Thakur's efforts succeed; 200 Indians stranded on ship in France will return on Monday

विरार : कोरोनामुळे देश विदेशांतील भारतीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. परदेशात अडकलेल्या भारतीयांना याचा सर्वात जास्त फटका बसला आहे. फ्रान्सधील एका जहाजावर कर्मचारी म्हणून कामाला असलेले २०० भारतीय अखेर १४० दिवसांनंतर भारतात परतणार आहेत.

नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर आणि वसईतील राॅसली घोन्सालवीस यांनी देश आणि विदेश पातळीवर या दोनशे भारतीयांच्या परतीसाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले. 

लॉकडाउनमुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारने ‘वंदे भारत मिशन’ हाती घेतल्यानंतर हजारो भारतीय मायदेशी परतले आहेत. या मिशन अंतर्गत २०० भारतीय मायदेशी परतणार आहेत, त्यात वसईतील १५ नागरिकांचा समावेश आहे. 

कोरोनाच्या महामारीने देशाबाहेरील सीमा बंद केल्यामुळे प्रदेशात अडकलेल्या भारतीयांचे परतीचे मार्ग बंद झाले होते. परदेशात असलेल्या भारतीयांना तसेच विद्यार्थ्यांना आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु होते. याच कालावधीत फ्रान्स, मार्सिले येथील कोस्टा क्रूझ या जहाज कंपनीतील कोस्टा स्मेराल्डा या प्रवासी जहाजावर तब्बल २०० भारतीय अडकून पडले होते. हे सर्वजण या जहाजावर क्रू मेंबर्स, कर्मचारी म्हणून कामाला होते. 

जहाजावर अडकलेल्या २०० जणांमध्ये वसईचे १५ जण असल्याने त्यांच्या सुटकेसाठी येथून राॅसली घोन्सालवीस यांनी प्रयत्न सुरु केले होते. त्यांनी नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्याकडे या सर्वाना भारतात आणण्यासाठी पाठपुरावा सुरु केला होता. क्षितिज ठाकूर यांनीही यात लक्ष घालून थेट परराष्ट्र मंत्रालय तसेच फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे पत्रव्यव्हार करून पाठपुरावा सुरु केला होता. 

वंदे भारत मिशन अंतर्गत जगभरातील भारतीय पुन्हा मायदेशी परतत असताना या जहाजावर अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी क्षितिज ठाकूर आणि वसईतील राॅसली घोन्सालवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मदत घेत थेट दिल्ली येथील परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. विदेश मंत्री सुब्रम्हण्यम जयशंकर, त्याचप्रमाणे फ्रान्स सरकारशीही पत्रव्यवहार करत या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते. या पाठपुराव्याला यश आले असून आता हे २०० भारतीय एकाच वेळी मायदेशात परतणार आहेत. ते एअर इंडियाच्या ए आय ११२२ या विमानाने उद्या (ता. २० जुलै) पहाटे भारतात दाखल होत आहेत.

इटली, रोम येथून शनिवारी (ता. 18 जुलै) १२ तासांच्या बस प्रवासानंतर ते मार्सिलेला आले असून तेथून विमानाने ते उद्या पहाटे मुंबईत येणार आहेत. येथून उड्डाणांची व्यवस्था केल्याबद्दल भारत सरकारचे त्यांनी आभार मानले आहेत. या सर्व घडामोडीत त्यांना माजी महापौर प्रवीण शेट्टी व पोलिस अधिकारी संदेश हंबीरे यांची मोलाची साथ मिळाली. 


मी फक्त कर्तव्य केले : आमदार क्षितिज ठाकूर 

माझ्या वसई तालुक्यातील नागरिकांना परत आणण्यासाठी त्यांना ज्या ठिकाणी माझी मदत लागली, त्या ठिकाणी मी मदत करण्याचा प्रयत्न केला. उलटपक्षी ते माझे कर्तव्य होते असे मी मानतो. याकामी चिकाटीने पाठपुरावा करणाऱ्या राॅसली घोन्सालवीस यांचे कौतुक करण्यासारखे आहे.

वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर आतापर्यंत जवळपास ६० लाख लोकांना जेवण, आयसोलेशन सेंटरसाठी आमचे विवा कॉलेज उपलब्ध करून दिले आहे. तरुणांना बरोबर घेऊन रक्तदान शिबिरे सुरु केली आहेत. मास्क वाटप, अर्सेनिक गोळ्यांचे वाटप, जंतुनाशक फवारणीसाठी यंत्र, त्याचबरोबर शहरात सुरु केलेल्या क्वारंटाइन सेंटरमधील नागरिकांसाठी नाश्ता आणि दोन वेळचे जेवण जीवदानी मंदिर ट्रस्टतर्फे मोफत उपलब्ध केले आहे. 

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com