नारायण राणे मंत्री झाल्याने उद्धव ठाकरेंच्या पोटात दुखतंय   

पोलिसांना बाजूला ठेवा आणि मग आंदोलन करायला या, मग बघू.
नारायण राणे मंत्री झाल्याने उद्धव ठाकरेंच्या पोटात दुखतंय   
MLA Ashish Shelar criticizes Chief Minister Uddhav Thackeray

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची शिवसेनेला भीती का वाटते. नारायण राणे मंत्री झाले म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पोटात दुखत आहे, त्यामुळे शिवसेनेने राणे यांच्या अटकेचे हे षडयंत्र रचले होते, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केला. (MLA Ashish Shelar criticizes Chief Minister Uddhav Thackeray)

दरम्यान, राज्यातील सरकार दबावतंत्राचा वापर करत आहे. सर्वसमावेशक कारवाई केली जात नाही असा आरोप करून पोलिसांना बाजूला ठेवा आणि मग आंदोलन करायला या, मग बघू असा इशाराही शेलार यांनी या वेळी बोलताना दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने केंद्रीय मंत्री राणे यांना काल अटक करण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा राणेंना महाड येथील न्यायालयाने जामीन मंजूर झाला. या अटकेच्या कारवाईवरून शेलार यांनी राज्य सरकार विशेषतः शिवसेनेवर टीका केली. 

ते म्हणाले की, सुभाष जाधव या शेतकऱ्याने, तर पालघरमध्ये आदिवासी कुटुंबातील काळू पवार यांनी 500 रुपयांसाठी आत्महत्या केली. इंदापूर येथे शिवाजी चितळकर या शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. राज्य सरकारच्या कारभाराला कंटाळून या आत्महत्या होत आहेत. सरकारविरोधात जनक्षोभ वाढत आहे. त्यावरील लक्ष भटकविण्यासाठी शिवसेना आंदोलन करत आहे. शिवसेनेकडून अत्यंत गलिच्छ राजकारण केले जात आहे. सुरुवात तुम्ही केलीय, शेवट मात्र आम्ही करू.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही दिल्लीत हल्ला झाला होता. त्यावेळी त्यांनी संयम दाखवला होता. राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची शिवसेनेला भीती  वाटत असावी. त्यातूनच शिवसेनेने राणे यांच्या अटकेचे हे षड्यंत्र रचले होते. केंद्रीय मंत्र्याला अटक व्हावी, हे दुर्दैव आहे. जी घटना महाराष्ट्राने पहिली, तालिबानी कारभार पाहता, आता त्यामुळे पुढे जाण्याचा विषय नाही, असेही शेलार म्हणाले.

राज्यातील सरकार हे दबावतंत्राचा वापर करत आहे.आंदोलनप्रकरणी सर्वसमावेशक कारवाई केली जात नाही. पोलिसांना बाजूला ठेवावे आणि मगच आंदोलन करायला या. मग बघू, असे खुले आव्हानही शेलार यांनी शिवसेनेला दिले.

Related Stories

No stories found.