परमबीरसिंगांच्या लेटरबाँबनंतर मुंबई पोलिस दलात मोठे फेरबदल शक्य

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या गंभीर आरोपांची सरकार दरबारी गंभीर दखल घेण्यात आली असून आगामी काळात मुंबई पोलिस दलात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Anil Deshmukh - Mumbai Police Logo - Parambir Singh
Anil Deshmukh - Mumbai Police Logo - Parambir Singh

मुंबई : माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या गंभीर आरोपांची  सरकार दरबारी गंभीर दखल घेण्यात आली असून आगामी काळात मुंबई पोलिस दलात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Many Changes Likely in Mumbai Police after Parambirsingh Letter Bomb)

निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणात खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आले आहेत. या प्रकरणात मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीरसिंग (Parambirsingh) यांची उचलबांगडी करण्यात आली होती. आता परमबीरसिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी थेट पत्र लिहिले असून, यात गृहमंत्र्यावरच खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. गृहमंत्र्यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा धक्कादायक आरोप परमबीरसिंग यांनी केला आहे. 

राज्य सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमबीरसिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की. अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) सचिन वाझेंना प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते.अनिल देशमुखांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. मागील काही महिन्यांत वाझेंना गृहमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी अनेक वेळा बोलावले होते. या भेटींमध्ये ते वाझेंना निधी गोळा करण्यासाठी सांगत. 

आता या पत्रानतर खाते अंतर्गत चौकशीला सुरूवात होण्याची शक्यता आहे. परमबीर यांनी पाठवलेल्या मेल बाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. परमबीर यांनी केलेल्या आरोपपत्रात परमबीर यांची स्वाक्षरी नसल्याने या ईमेलचा पत्ता तपासला जाणार आहे. परमबीरसिंग यांचा फोन बंद येत असल्याने, गृहविभागाकडून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. (Many Changes Likely in Mumbai Police after Parambirsingh Letter Bomb)

दरम्यान, परमबीर यांचा अधिकृत ईमेल आयडी आणि प्राप्त झालेल्या मेलच्या ईमेल आयडीत  तफावत असल्याचा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे. हे ईमेल आयडी तपासून घेण्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून आदेश देण्यात आले आहेत. खरचं गृहमंञ्यांनी असे आदेश संबधित अधिकाऱ्यांना बोलावून दिले होते का ? हे तपासण्यात येणार असून त्यानुसार त्या दोन बड्या अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

हे दोन्ही अधिकारी परमबीर यांच्या जवळचे असल्याच्या गृहमंत्र्यांच्या आरोपानंतर खळबळ उडाली आहे. संबधित आरोपांबात नवे पोलिस आयुक्त अधिकाऱ्यांना भेटीसाठी बोलावणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com