अनिल देशमुख आज देणार सीबीआयच्या प्रश्नांची उत्तरे

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने समन्स बजावले आहे.या प्रकरणी आता अनिल देशमुख यांची आज सीबीआय कार्यालयात चौकशी होणार आहे.
Anil Deshmukh
Anil Deshmukh

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री  अनिल देशमुख Anil  Deshmukh यांना सीबीआयने CBI समन्स बजावले आहे. या प्रकरणी आता अनिल देशमुख यांची आज सीबीआय कार्यालयात चौकशी होणार आहे. Maharashtra Ex Home Minister Anil Deshmukh to Face CBI Questions today

या प्रकरणात या पूर्वी पाच जणांची चौकशी झालेली आहे. त्यात देशमुख यांचे दोन स्वीय सहाय्यक, सचिन वाझे, दोन पोलिस अधिकारी, स्वत: आरोप करणारे परमबिर सिंह यांची ही चौकशी झालेली आहे. १५ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

राज्य सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमबीरसिंग (Parambir Singh) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले होते. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला १००  कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. अनिल देशमुखांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. मागील काही महिन्यांत वाझेंना गृहमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी अनेक वेळा बोलावले होते. या भेटींमध्ये ते वाझेंना (Sachin Waze) निधी गोळा करण्यासाठी सांगत, असे आरोप परमबीर सिंग यांनी या पत्रात केले होते. Maharashtra Ex Home Minister Anil Deshmukh to Face CBI Questions today

मुंबईच्या अॅड. जयश्री पाटील (Jayashree Patil) यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्यांनी मलबार हिल पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. लाच मागण्याच्या संदर्भात अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी पाटील यांनी रिट याचिकेत केली होती. त्यावर न्यायालयाने प्राथमिक चौकशीचा आदेश दिला. देशमुख हे राज्याचे गृहमंत्री आहेत, ते पोलिस खात्याचे प्रमुख आहेत. त्यामुळे पोलिस खात्याकडून निःपक्षपाती चौकशी केली जाऊ शकत नाही, त्यामुळे ही सीबीआयने ही प्राथमिक चौकशी करावी, असे न्यायालयाने त्यावेळी म्हटले होते.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com