Maharashtra does not have a Chief Minister, Narayan Rane attacks Shiv Sena | Sarkarnama

महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच नाहीत, नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 6 जुलै 2020

एकेकाळी शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ असलेले राणे हे आज तरी शिवसेनेला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.

पुणे : "" एकीकडे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारवर तुटून पडत असताना आता ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनीही आपल्या नेहमीच शैलीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज समाचार घेतला. महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच नाही असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. 

कोरोनाचे संकट त्यानंतरचे लॉकडाऊन तसेच दररोज वाढणारे रुग्ण. लोकांना सोयीसुविधा मिळत नसल्याच्या वाढत्या तक्रारी तसेच सरकारच्या एकंदरीच कारभारावर राणे यांनी आज तोफ डागली.

राणे म्हणाले, की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिकाऱ्यांच्या पिंजऱ्यात आहेत. ते मातोश्रीच्या बाहेरही पडत नाहीत. महाराष्ट्राला मुख्यमंत्री आहे की नाही हा प्रश्‍न राज्यातील जनतेला पडला आहे. त्यांना सत्तेवर राहाण्याचा मुळीच अधिकार नाही. आता मंत्रालयाचे नाव बदलून सचिवालय करायला हवे.'' 

नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे कडवे विरोधक म्हणून ओळखले जातात. एकीकडे फडणवीस 
हे आघाडी सरकारवर कडाडूनू हल्ला चढवित असताना आता राणेही मैदानात आहेत.

एकेकाळी शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ असलेले राणे हे आज तरी शिवसेनेला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. मुंबई, पुणेसह राजायात वाढलेल्या कोरोनाचे रुग्ण तसेच राज्य सरकारचा ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे त्याविषयी राणे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. 

ते म्हणाले, "" मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर पडले पाहिजे पण, तसे होताना दिसत नाही. अधिकारीच निर्णय घेत आहे. मुख्यमंत्री अधिकाऱ्यांच्या पिंजण्यात अडकले आहेत.त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.!'' 

राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी काही महिन्यापूर्वी कोकणातील खराब रस्त्याचा मुद्दा उपस्थित करून एका अधिकाऱ्याच्या अंगावर चिखल फेकला होता. या प्रकरणाने राज्यात संताप व्यक्त केला गेला होता. नितेश राणे यांचा अधिकारी संघटनांनीही निषेध केला होता.

आता हे प्रकरण न्यायालयात आहे. याचा निकाल तातडीने लागावा यासाठी हा खटला फास्ट ट्रकमध्ये चालवावा यासाठी शिवसेनेचे सरकार प्रयत्नशील असल्याचे समजते. शिवसेना आणि राणे हा संघर्ष सुरूच आहे. या संघर्षातून राणे हे शिवसेनेला विशेषत: उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करीत असतात. तसेच शिवसेनाही आपल्या पद्धतीने राणेंच्या अडचणी कशा वाढतील हे पाहत असते.  

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख