Lockdown again in Bhiwandi, Ambernath | Sarkarnama

भिवंडी, अंबरनाथमध्ये पुन्हा लॉकडाऊन 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 जून 2020

मुंबई : जोगेश्‍वरी येथील एका कुटुंबातील आठ जणांनी कोनोनावर मात केली आहे.

मुंबई : देशात आजही पाचवा लॉकडाऊन सुरू आहे. हा लॉकडाऊन शिथील असला तरी कोरोना रुग्णांची संख्या काही शहरामध्ये कमी होत नाही. त्यामुळे अतिदक्षता म्हणून प्रथम भिवंडीमध्ये त्यानंतर अंबरनाथमध्ये (जि. ठाणे) पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे.

या दोन्ही शहरातील नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. 

मुंबई, पुणे, मालेगाव, भिवंडी आणि अंबरनाथमधील कोरोनाची संख्या वाढतच चालली आहे. प्रशासन आपल्यापरिने कोरोनाला थोपविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. भिवंडीपाठोपाठ आता अंबरनाथमध्ये येत्या तीस जूनपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे.

नागरिकांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करून कोरोनाचे शहरावरील संकट दूर करण्यास मदत सहकार्य करावे असे आवाहन क्‍रण्यात आले आहे. अंबरनाथमध्ये आता उद्यापासून (ता.23) हे लॉकडाऊन सुरू होणार आहे. 

कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वत्र कडकडीत बंद राहणार आहे. त्यामुळे शहरात पोलिंसांची जबाबदारी अधिक वाढणार आहे. तसेच भिवंडीत टाळेबंदी येत्या गुरूवारपासून करण्यात येणार असून ती 3 जुलैपर्यंत राहणार आहे. मुंबईत तर कोरोनाचे संकट वाढत आहे तर बऱ्या होणाऱ्या रुग्णाची संख्याही वाढत आहे.  

एकाच कुटुंबातील आठ जणांची कोरोनावर मात 

मुंबई : जोगेश्‍वरी येथील एका कुटुंबातील आठ जणांनी कोनोनावर मात केली आहे. वेळेत निदान आणि औषधोपचार, तसेच महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्‍वास यामुळेच आम्ही सर्व कोरोनामुक्‍त झाल्याचे या कुटुंबीयांनी सांगितले. 

जोगेश्‍वरी पश्‍चिमेच्या बेहरामबाग येथे राहणाऱ्या या कुटुंबातील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे प्रथम समोर आले. यामुळे क्‍लोज कॉन्टॅक्‍टमधील सर्व कुटुंबाला क्‍वारंटाईन करून त्याचींही कोरोना चाचणी केली.

यात सात वर्षीय मुलीचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. मात्र क्‍लोज कॉन्टॅक्‍टमुळे तीदेखील संशयित होती. कुटुंबातील सर्वजण कोरोनाच्या तावडीत सापडल्याने क्‍वारंटाईनमुळे कुटुंबाची ताटातूट झाली. 

यामध्ये 72 वर्षांच्या उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या आजीबाईपासून सात वर्षांच्या मुलीचा समावेश होता. मात्र अशा वेळी कुटुंबातील कुणीही धीर सोडला नाही. मोबाईलच्या माध्यमातून सर्वजण एकमेकांना धीर देत राहिले.

औषधोपचाराबरोबरच खबरदारी आणि आत्मविश्‍वास हाच कोरोना रोखण्याचा उपाय असल्याचे कुटुंबीयांनी सागितले. त्यांचा क्‍वारंटाईन काळही नुकताच पूर्ण झाला आहे. संपूर्ण कुटुंब आता ठणठणीत आहे.  

 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख