देवरूख : ज्या वेळी नारायण राणे शिवसेनेत होते, मुख्यमंत्री झाले, विरोधी पक्षनेते झाले, त्या वेळी यांना त्यांचे शिक्षण आड आले नाही. आता भाजपमध्ये त्यांचे वाढलेले वजन पाहून त्यांचे शिक्षण काढले जात आहे. खासदार विनायक राऊत यांनी बेताल वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा मतदारसंघातील विकासकामांबाबत बोलावे, असा सणसणीत टोला भाजप संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव यांनी दिला आहे.
तालुका भाजप कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी अभिजित शेट्ये, सुशांत मुळ्ये, सुधीर गुरव, सुधीर यशवंतराव, रूपेश कदम, राजेश गवंडी, अमोल गायकर, मिथुन निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते. खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेते खासदार नारायण राणे यांच्यावर टीका केल्यानंतर कोकणातले वातावरणात चांगलेच तापले आहे. माजी खासदार नीलेश राणेंनीही याला जोरदार प्रत्युत्तर दिले. आज तालुका भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली. आता आमचा पक्ष पूर्वीसारखा सोशिक राहिला नाही तर आम्हीही आमच्या पद्धतीने उत्तर द्यायला सज्ज आहोत, असे अधटराव यांनी सांगितले.
शिवसेनेला उतरती कळा
शिवसेनेला आता उतरती कळा लागली आहे. पक्षाच्या कार्यक्रमांना हजारोंची गर्दी चालते; मात्र छत्रपती शिवाजी महाराजाच्या जयंतीला लोकं नकोत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी सोयरीक झाल्याने आता हे हिंदुत्व विसरले आहेत, अशीही टिका त्यांनी केली.
शिवसेनेला धोका आहे, हे समजल्याने..
अधटराव म्हणाले, खासदार विनायक राऊत यांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. शिवसेना प्रमुखांनी राणे साहेबांना मुख्यमंत्री केले, तेव्हा त्यांचे शिक्षण विचारले नव्हते तर त्यांची कार्यपद्धती पाहिली. यातून कोकणचा विकासच झाला. आता ते भाजपमध्ये आले. त्यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा इथे आले. यातून राणे यांचे पक्षात वाढलेले वजन पाहून आता शिवसेनेला धोका आहे, हे समजल्याने खासदारांची वायफळ बडबड सुरू आहे. यांचा विकास म्हणजे केवळ रस्ते आणि पाखाडीपुरताच मर्यादित आहे.
काय म्हणाले अधटराव....
नाणार यांना नाही चालत
आज सगळे पक्ष नाणारसाठी प्रयत्नशील
खासदार गप्प का? याचे उत्तर त्यांनी द्यावे
अस्तित्वासाठी आमच्या नेत्यांवर वायफळ टीका
टीका आम्ही आता सहन नाही करणार
Edtied By - Amit Golwalkar

