....तर पवारांनी स्वतःच चौकशी करावी - रिबेरो - Julio Ribeiro declines to be part of Parambir Singh Issue Inquiry Committee | Politics Marathi News - Sarkarnama

....तर पवारांनी स्वतःच चौकशी करावी - रिबेरो

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 मार्च 2021

परमबीर सिंग प्रकरणात माजी पोलिस महासंचालक ज्युलियो रिबेरो यांनी चौकशी करावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुचविल्यानंतर काही तासांतच या चौकशीस खुद्द रिबेरो यांनी नकार दिला आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या विरोधात ही चौकशी असेल तर स्वतः पवार यांनीच ती करावी, कारण ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत, असे रिबेरो म्हणाले आहेत

मुंबई : परमबीर सिंग प्रकरणात माजी पोलिस महासंचालक ज्युलियो रिबेरो यांनी चौकशी करावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुचविल्यानंतर काही तासांतच या चौकशीस खुद्द रिबेरो यांनी नकार दिला आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या विरोधात ही चौकशी असेल तर स्वतः पवार यांनीच ती करावी, कारण ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत, असे रिबेरो म्हणाले आहेत. (Julio Ribeiro declines to be part of Parambir Singh Issue Inquiry Committee)

परमीबीरसिंग यांनी केलेल्या आरोपानंतर काल दिवसभर राजकीय गदारोळ सुरू  होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील यांची अडीच तास बैठक झाली. पवार यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी रिबेरो (Julio Ribeiro) यांच्यासारख्या अधिकाऱ्याची चौकशी समिती नेमण्याबाबत सूचक वक्तव्य केले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांच्याबद्दल निवृत्त पोलिस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी तीन वर्षांपूर्वीच इशारा दिला होता. `बॅड काॅप` म्हणून परमबीरसिंह यांची संभावना केली होती.

मात्र, त्यानंतर माध्यमांनी विचारणा केल्यावर रिबेरो यांनी आपण चौकशीच्या भानगडीत पडणार नसल्याचे स्पष्ट केले. आपण आता ९२ वर्षांचे आहोत, त्यामुळे आपल्याला हे शक्य नाही, असे रिबेरोंनी म्हटले आहे. जरी मला शक्य असते तरी मी ही चौकशी केली नसती कारण ज्या पद्धतीचे खालच्या दर्जाचे राजकारण खेळले जात आहे, त्यात माझ्यासारख्याने पडू नये, असे मला वाटते, असेही रिबेरो म्हणाले. (Julio Ribeiro declines to be part of Parambir Singh Issue Inquiry Committee)

शंभर कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपाबाबत विचारले असता रिबेरो म्हणाले, ''ज्यावेळी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना याबाबत समजले, त्यावेळी त्यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांना याची कल्पना द्यायला हवी होती. हे आपले काम नव्हे, हे सांगायला हवे होते. मात्र, बदली झाल्यानंतर लिहिलेल्या पत्राला अर्थ नाही,''
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख