राज ठाकरेंना बाळासाहेबांबद्दल किती आदर आहे, हे दिसून आले

बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाची उंची बघितली तर त्यांच्या नावावरून कोणी राजकारण करू नये.
It shows how much respect Raj has for Balasaheb Thackeray : Arvind Sawant
It shows how much respect Raj has for Balasaheb Thackeray : Arvind Sawant

मुंबई  ः नवी मुंबई येथील नियोजित विमानतळाच्या नामकरणावरून राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. शिवसेनेकडून या विमानतळास बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्याची मागणी पुढे रेटली जात आहे, तर स्थानिकांमधून दि. बा. पाटील यांच्या नावाची मागणी होत आहे. त्या वादात आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उडी घेत या विमानतळास शिवाजी महाराजांचे नाव राहील, असे म्हटले आहे. त्यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी राज यांना बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल किती आदर आहे, त्यांच्या या वक्तव्यातून समोर आले आहे, अशी टीका केली आहे. (It shows how much respect Raj has for Balasaheb Thackeray : Arvind Sawant)

नवी मुंबई येथील विमानतळास बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावर शिवसेना ठाम आहे, तर स्थानिक सर्वपक्षीय नेते हे दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आग्रही आहेत. त्यावरून नवी मुंबईत संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक झाली. त्यात कृती समितीच्या नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेवर नाराज होत मुख्यमंत्री दोनवेळा मिटिंग सोडून निघून गेले होते. आता सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 

दरम्यान, समितीच्या लोकांनी आज (ता. २१ जून) मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी वरील भूमिका मांडली होती. मात्र, त्या भूमिकेवरून शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी राज यांच्यावर निशाणा साधला आहे. खासदार सावंत म्हणाले की, मुंबई विमानतळाचे विस्तारीत भाग हे नवी मुंबईचे विमानतळ आहे, हा राज ठाकरे यांच तर्क आहे. हे विमानतळ खरं तर नवीन आहे.  मुंबई विमानतळचं extension आहे, हा मतितार्थ त्यांनी काढला आहे.

नवी मुंबई येथील विमानतळास बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, असा जीआर निघाला आहे. पण, त्यांच्या नावावरून होत असलेल्या वादाबद्दल वाईट वाटतं. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल राज यांना किती आदर आहे, हे समोर आले आहे. ते खेदजनक आहे. दि. बा. पाटील यांच काम चांगलंच आहे. यात काही वादच नाही. जातीचं राजकारण काही लोक करत आहेत. दि. बा. पाटील यांचे नाव वेगळ्या गोष्टींसाठी देऊ. बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वाची उंची बघितली तर त्यांच्या नावावरून कोणी राजकारण करू नये. राजकारण बाजूला सारून सगळ्या पक्षांना मुख्यमंत्र्यांनी  आवाहन केलं आहे. बाळासाहेब ठाकरे हयात नाहीयेत म्हणूनच त्यांचे नाव विमानतळास देतोय ना. ते जर आज हयात असते तर प्रश्नच आला नसता, असेही अरविंद सावंत यांनी नमूद केले.


शिवसेना पालख्या वाहणार नाही आणि लाचारीही पत्करणार नाही, यातच सर्व मतितार्थ आला आहे, अशा शब्दांत आगामी निवडणुका आणि युती-आघाडीबाबत अरविंद सावंत यांनी भाष्य केले.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक लपले वैगेरे वाटत नाही. त्यांनी पत्रात लिहिलेले विनाकारण त्रास दिला जात आहे, हा विनाकारण त्रास हा शब्द महत्वाचा आहे. हा त्रास कसा देतात, हे पश्चिम बंगालमध्ये आपण पाहिलंय. विरोधी पक्षात असल्यावर तो वाल्या असतो, भाजपत आल्यावर त्याचा वाल्मिकी होतो, हे भाजपने लक्षात घ्यावे, असेही त्यांनी नमूद केले.

युतीबाबत बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, ज्या पद्धतीने मित्र वागत आहेत, त्यावरून ते प्रेम करतात, असं वाटत नाही. पक्ष वाढवण्यासाठी जर कोणी भेटीगाठी, अभ्यास करत असेल तर त्यात चुकीचं काय आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com