inter districts travel not allowed in State, Malls, Hotels to be closed till June 30 | Sarkarnama

जिल्ह्याबाहेरील प्रवासाला ठाकरे सरकारची मनाई; वाहने वापरता येणार; माॅल, रेस्टाॅरंट बंदच

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 31 मे 2020

केंद्र सरकारने पाचवा लाॅकडाऊन जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रानेही त्या धर्तीवर तीस जूनपर्यंत तो आता वाढवला आहे. 

पुणे : केंद्र सरकारने पाचवा लाॅकडाऊन जाहीर करताना दिलेल्या सवलती महाराष्ट्र सरकारने देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे  महाराष्ट्रात माॅल उघडण्यास परवानगी मिळणार नाही. एकूण संख्येच्या निम्मीच दुकाने सुरू राहतील, अशी व्यवस्था केली आहे. हाॅटेल आणि रेस्टाॅरंटही बंद राहतील. प्रार्थनास्थळेही सर्वांसाठी खुली करण्यास परवानगी मिळालेली नाही. खासगी कार्यालये दहा टक्के क्षमतेने सुरू करता येतील. कंटेन्मेंट झोन वगळता इतर ठिकाणी सवलती देण्यात येणार आहेत.

मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व महापालिका, पुणे, मालेगाव, सोलापूर, औऱंगाबाद, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर या शहरांत आणि इतर ठिकाणी (नाॅन कंटेन्मेंट झोन) खालील काही सवलती जाहीर झाल्या आहेत.  केंद्र सरकारने माॅल, मंदिरे, हाॅटेल सुरू करण्यास परवानगी दिली होती. ती राज्याने नाकारली.

आठ जूनपासून लाॅकडाऊन टप्पा पाचच्या सवलती सुरू होणार आहेत. तोपर्यंत आहे त्याच पद्धतीने कामकाज चालणार आहे. या दिलेल्या सवलती पुढीलप्रमाणे 

बाजार, दुकाने ही पी-1, पी-2 या तत्त्वार सुरू राहणार. रस्त्याच्या एका बाजूची दुकाने सम तारखेला आणि दुसऱ्या बाजूची विषम तारखेला उघडतील

दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेतच उघडी राहतील.

कपड्यांच्या दुकानांत ट्रायल रूम वापरण्यास परवानगी नाही

दुकानाती एक्स्चेंज पाॅलिसी आणि रिटर्न पाॅलिसीला परवानगी नाही

दुकानात सोशल डिस्टन्सिंगची जबाबदारी दुकानदारांची. ते न केल्यास अधिकारी दुकान बंद करतील.

जवळच्या दुकानात जावे. खरेदीसाठी सायकल वापरावी किंवा पायी जाण्याचा सल्ला.

अनावश्यक बाबींसाठी लांबचा प्रवास करण्यास मनाई

.............

प्रवासासाठी  सवलत (सार्वजनिक आणि वैयक्तिक)

टॅक्सी कॅंब (1 ड्रायव्हर अधिक 2)

रिक्षा (1 अधिक 2)

चारचाकी (1 अधिक 2)

टुव्हिलर (फक्त 1)

............

आठ जूनपासून या सवलती मिळणार

खासगी कार्यालयांत दहा टक्के कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी सवलत मिळणार. त्यासाठी योग्य त्या खबरदारी घ्यावी. सॅनिटायझेशनची काळजी मालकांनी घ्यावी.

स्पोर्टस काॅम्प्लेक्स,  खुली मैदाने, स्टेडिअम वैयक्तिक व्यायामासाठी खुली. प्रेक्षकांना परवानगी नाही. इनडोअरसाठी परवानगी नाही.

जिल्हाअंतर्गत बसप्रवासाला सवलत. पण 50 टक्के क्षमता वापरता येणार.

जिल्ह्याबाहेरील प्रवासाला अद्याप परवानगी नाही. त्यासाठी स्वतंत्र आदेश काढण्यात येईल

....

हे बंदच राहणार

शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि इतर बंद

आंतरराष्ट्रीय विमानप्रवास, मेट्रो, रेल्वे बंद

सिनेमा हाॅल, जिम्नॅशिअम, पोहण्याचे तलाव, मनोरंजन केंद्रे, थिएटर, उद्याने, बार, सभागृहे बंद राहणार

धार्मिक स्थळे, मंदिरे, प्रार्थना केंद्र बंद राहणार

शाॅपिंग माॅल, रेस्टाॅरंटस आणि इतर हाॅस्पिटॅलिटी सेवा बंदच राहणार

............................... 

  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख