परप्रांतांतून येणाऱ्या कामगारांच्या चाचण्या करा - राज ठाकरेंची सरकारला सूचना

मागे लाॅकडाऊन नंतरइथले कामगार बाहेरच्या राज्यामध्ये परत गेले, तेव्हा मी सूचना केली होती की परत येतील तेव्हा माणसे मोजा आणि चाचणी करा. पण या सरकारने ते केले नाही. त्या कामगारांच्या चाचण्या झाल्या नाहीत.कोणी येत कोणी जातं, त्यात महाराष्ट्रातील लोक घरात अडकत आहेत, असे प्रतिपादन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी येथे केले
Raj Thakackeray
Raj Thakackeray

मुंबई : "मागे लाॅकडाऊन नंतर इथले कामगार बाहेरच्या राज्यामध्ये परत गेले, तेव्हा मी सूचना केली होती की परत येतील तेव्हा माणसे मोजा आणि चाचणी करा. पण या सरकारने ते केले नाही. त्या कामगारांच्या चाचण्या झाल्या नाहीत. कोणी येत कोणी जातं, त्यात महाराष्ट्रातील लोक घरात अडकत आहेत. लोकांची व्यापाऱ्यांची विद्यार्थ्यांची वाताहत होते आहे,'' असे प्रतिपादन करत परप्रांतातून येणाऱ्यामुळे कोरोना वाढत असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज सूचित केले. Increase Corona tests of Workers coming from other States Say Raj Thackeray

राज यांनी आज पत्रकारांशी बोलताना विविध विषयांवर आपली मते मांडली. मुख्यमंत्र्यांशी काल झालेल्या चर्चेचा तपशीलही त्यांनी दिला. ते म्हणाले की, शाळा ज्या फी आकारात आहे ती जास्त आहे. त्यामुळे शाळांना अर्धी फी घ्यायला सांगावे, असे आपण मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. राज्यातले जे खेळाडू आहेत त्यांच्या सरावासाठी मैदाने, जीम, जलतरण तलाव कसे खुले करता येतील, ते पहावे असेही आपण मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. 

''लहान व्यापारी आणि कारखाने यांना उत्पादनाला परवानगी आहे मात्र विक्रीला नाही. मग ते का उपादन करतील आणि केले तरी कुठे ठेवतील. आठवड्यातीन किमान २  ते ३ दिवस दुकाने उघडली पाहिजे. जेणेकरुन त्यांना आपल्या उत्पादनांची विक्री करता येईल.  त्याच बँकांची हप्त्यांसाठी जबरदस्ती सुरु आहे. बँकांकडे पैसे परत गेले पाहिजेत हे मान्य. पण लोकांकडे पैसे असतील तर ते बँकांकडे जातील. त्यामुळे सर्व बँकांशी सरकारने बोलावे. सक्तीने जे पैसे वासून केले जात आहेत त्याबाबत बँकांना सूचना द्यावी,'' असेही राज ठाकरे म्हणाले. Increase Corona tests of Workers coming from other States Say Raj Thackeray

लाॅकडाऊन बाबत बोलताना ते म्हणाले, "लोकडाऊन झाला तेव्हा तो बऱ्यापैकी पाळला गेला, पुन्हा सर्वजण लोकडाऊन पाळतील. पेशंट ची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र औद्योगिक राज्य आहे त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांची संख्या खूप आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आहे.  बाहेर कोरोना नाही का हा प्रश्न आहे. बाहेरून आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लोक येतात. बाहेर राज्यात आकडे मोजले जात नाहीत. तिथे न मोजल्यामुळे आकडे कळत नाहीत,"असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

या वर्षी १० वी आणि १२ वीच्या मुलांना प्रमोट करा. त्यांना असेच पुढे ढकलले पाहिजे. हे विद्यार्थी परिक्षा कशा देणार? त्यांचा निकाल काय येणार? हे काही माहित नाही. त्यामुळे खालच्या इयत्तेतील मुलांना प्रमोट करतात तसे १० वी आणि १२ वीच्या मुलांना करावं, अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे राज यांनी सांगितले.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com