जनता सोबत असेल तर सरकार पडूच शकत नाही,ठाकरेंचा नाव घेता फडणविसांना टोला 

सरकारला कोणताही धोका नाही हे स्पष्ट करताना त्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे मात्र नावही घेतले नाही.
 जनता सोबत असेल तर सरकार पडूच शकत नाही,ठाकरेंचा नाव घेता फडणविसांना टोला 

पुणे : "" तुम्ही सोबत असाल तर (मायबात जनता) सरकार पडूच शकत नाही. प्रत्येक पाऊल टाकताना ते चुकीचे पडणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत, खबरदारी तुम्ही घ्या, जबाबदारी आम्ही घेतो असे आवाहन मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला केले आहे. 

दरम्यान, सरकारला कोणताही धोका नाही हे स्पष्ट करताना त्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे मात्र नावही घेतले नाही. 

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधत कोरोनाच्या संकटात जनतेने साथ देण्याचे कळकळीचे आवाहन त्यांनी केले आहे. गेल्या काही दिवसापासून ठाकरे सरकारविरोधात भाजप आक्रमक झाला असून हे सरकार संकटात कसे अपयशी ठरले याचा पाडा वाचत आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सातत्याने ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना लक्ष्य करीत आहेत. भाजपच्या राजकारणाची आपल्या भाषणात दखल घेत ठाकरे यांनी विरोधीपक्षांना चिमटे काढले मात्र कोणाचे नाव घेतले नाही. 

ठाकरे म्हणाले, "" कोरोनामुळे काही गोष्टी आपणास शिकायला मिळाल्या आहेत. राज्यात आरोग्य सुविधा वाढविण्याची गरज आहे तसेच आपले सरकार शिक्षणालाही प्राधान्य देत आहे. विशेषत:आरोग्या सुविधा राज्यभर निर्माण करायची आहे. त्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. सरकारला कोणताही धोका निर्माण होणार नाही .

संपूर्ण वाट निसरडी आहे पण, पाऊल जपून टाकत आहोत. शेवटी जनता जर सरकारबरोबर असेल तर घाबरण्याचे काहीही कारण नाही. सरकार पडू शकत नाही. राज्यातील शिक्षण कसे सुरू ठेवता येईल याकडेच सरकारचे लक्ष आहे. मी असं ठरवलं आहे, की शिक्षण आणि आरोग्यालाच प्राधान्य द्यायचे. शिक्षणालचा खेळखंडोबा कधीही होऊ देणार नाही '' 


दरम्यान, स्थलांतरित मजुरांसाठी आपल्या सरकारने चांगले काम केले आहे असा दावाही त्यांनी केला. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामध्ये स्थलांतरित मजुरांना आपआपल्या राज्यात सोडण्यासाठी केंद्रांने रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना विशेषत: मुख्यमंत्री उद्वव ठाकरे आग्रही होते.

पण, केंद्राने या गाड्या सोडण्याबाबत सहकार्य केले नाही अशी ओरड शिवसेनेने सुरू केली होती. मात्र आज मुख्यमंत्री ठाकरेंचे गोयलांविषयी प्रेम उफाळून आले असून त्यांनी ट्रेन उपलब्ध करून दिल्याबद्दल गोयलांना धन्यवाद म्हणत आभार मानले आहेत. 

स्थलांतरित मजुरांना आपआपल्या राज्यात पाठविण्याबाबत "तू तू मै मै' सुरू होते. त्याबाबत काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडून पुरेशा ट्रेन उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली होती. अर्थात बोट केंद्रातील मोदी सरकारकडे होते. ठाकरेंच्या या आरोपामुळे केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल चांगले संतप्त होत.

त्यांनी तुम्हाला हव्या तेवढ्या ट्रेन पाठवितो. प्रवासी तयार ठेवा असे ट्विट करून थेट आव्हान दिले आहे. मात्र आज रेल्वेमंत्र्यांनी मदत केल्याबद्दल त्यांनी पियूष गोयलांचे आभार मानले आहेत.लाईव्हमध्ये गोयलांचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गोयलांनी महाराष्ट्रासाठी किती गाड्या अधिक सोडल्या याचीच चर्चा आता होऊ लागली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com