महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी अमित शहांना पत्र लिहिणार : आठवले 

सचिन वाझे यांचे गॉडफादर कोण हे शोधले पाहिजे.
I will write a letter to Amit Shah to implement President's rule in Maharashtra : Athavale
I will write a letter to Amit Shah to implement President's rule in Maharashtra : Athavale

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेल्या स्फोटके प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची "एनआयए'ने चौकशी करून अटक केली आहे. मुकेश अंबानी यांचे घर उडविण्याच्या षडयंत्रामागे कुणाचा हात आहे, याची सखोल चौकशी व्हावी. स्फोटकांसारख्या प्रकरणात वाझे यांच्यासारख्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव येत असल्याने राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे.

ही मागणी घेऊनच आपण लवकर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठविणार आहोत, असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी (ता. 19 मार्च) सांगितले. 

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जलेटिनच्या कांड्या असलेली गाडी आढळल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी योग्य चौकशी केली नाही. त्यामुळे चौकशी एनआयएकडे गेली. त्यात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. स्फोटकांसारख्या गुन्हेगारी स्वरूपाच्या प्रकरणात वाझे यांच्यासारख्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आले आहे. ही मुंबई पोलिस आणि महाराष्ट्राच्या लौकीकाला टाच आणणारी आहे. 

या प्रकरणातील सचिन वाझे यांना महाराष्ट्र सरकारने संरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. जर एनआयएने चौकशी केली नसती तर राज्य सरकारने सचिन वाझे प्रकरण दडपून टाकले असते. सचिन वाझे यांचा शिवसेनेशी अनेक वर्षे संबंध राहिला आहे.

वाझे यांच्यासारख्या गुन्हेगारी स्वरूपाच्या अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा शिवसेना आणि राज्य सरकारचा प्रयत्न चुकीचा होता. सचिन वाझे यांचे गॉडफादर कोण हे शोधले पाहिजे. या प्रकरणाचा लवकर उलगडा झाला पाहिजे, त्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. 

हेही वाचा ः ...अन्‌ गृहमंत्री अनिल देशमुखांनी हात जोडले 

नवी दिल्ली : सचिन वाझे प्रकरणामुळे उठलेल्या वादळाने मुंबई पोलिस आयुक्तांची उचलबांगडी झाल्यांतर आता अनिल देशमुख यांच्याकडील गृहखाते काढून घेण्याबाबतची चर्चा सुरू झाली. त्यातच देशमुख हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेल्याने चर्चेला आणखी बळ मिळत आहे. कारण, पवारांना भेटून आल्यानंतर पत्रकारांनी त्यांच्या खातेबदलाबाबत विचारले असता देशमुखांनी चक्क हात जोडून विषय टाळत काढता पाय घेतला. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर दिल्लीत सुमारे दीड तास चर्चा केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख हे पत्रकारांशी बोलत होते. देशमुख म्हणाले, "विदर्भामधील नागपूर येथील मिहान प्रकल्पात मोठी, आंतरराष्ट्रीय इंडस्ट्रीज येण्याच्या विचारात आहे. ती इंडस्ट्रीज विदर्भात यावी, यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांची मदत व्हावी, यासाठी त्यांची भेट घेतली. याबाबत केंद्रीय पातळीवर मदत करावी, अशी विनंती त्यांना केली. याशिवाय मिहान प्रकल्पाबद्दलही मी त्यांना संपूर्ण माहिती दिली.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com