Big Breaking नारायण राणेंची सुरक्षा हटवली; राज ठाकरेंची घटवली

महाराष्ट्रातील भाजप आणि इतर पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात आली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली असून मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली आहे.
Raj Thackeray - Narayan Rane
Raj Thackeray - Narayan Rane

मुंबई : महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील काही नेत्यांची सुरक्षा कपात तर काहींची वाढवण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील भाजप आणि इतर पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची सुरक्षा व्यवस्था हटवण्यात आली असून मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. 

महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचावायणा उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आढावा बैठका घेत असते. ठाकरे कुटुंबातील चार जणांना वाय सुरक्षा कवच कित्येक वर्षापासून देण्यात आले आहे.महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची वाय दर्जाची सुरक्षा यंत्रणा झेड करण्यात आली होती. सुमारे एक वर्षापूर्वी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर याची सुरक्षा कमी करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णयही बहुचर्चित ठरला होता. आशिष शेलार, प्रसाद लाड यांचे सुरक्षादल त्याच सुमारास कमी करण्यात आले होते.

सुरक्षा कमी केलेले प्रमुख नेते व व्यक्ती (कंसात पूर्वीची सुरक्षा व्यवस्था) 
देवेंद्र फडणवीस - (झेड प्लस) - वाय प्लस एस्काॅर्टसह
राज ठाकरे - (झेड) - वाय प्लस एस्काॅर्टसह
अमृता फडणवीस (वाय प्लस एस्काॅर्टसह) - एक्स
कु. दिविजा फडणवीस (वाय प्लस एस्काॅर्टसह) एक्स
दीपक केसरकर - (वाय प्लस)- वाय
सुर्यकांत शिंदे - (वाय प्लस) - वाय
आशिष शेलार - (वाय्् प्लस) - वाय
राम नाईक - (वाय प्लस) - वाय``

यांची सुरक्षा व्यवस्था झाली रद्द (कंसाववत पूर्वीची व्यवस्था) 
अंबरीश अत्राम - (झेड नक्षल) 
चंद्रकांत पाटील-  (वाय प्लस एस्काॅर्टस) 
संजय बनसोडे - (वाय प्लस एस्काॅर्टस) 
सुधीर मुनगंटीवार (वाय प्लस- नागपूरमध्ये झेड)
नारायण राणे (वाय प्लस)
रावसाहेब दानवे (वाय प्लस)
राजकुमार बडोले (वाय)
हरिभाऊ बागडे (वाय)
राम कदम (एक्स)
प्रसाद लाड (एक्स)
मारोतराव कोवासे (एक्स)
शोभाताई फडणवीस (एक्स)
माधव भांडारी (एक्स)
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com