भाजपचे नेते रेमडेसिव्हिर सरकारला देणार होते, हे सपशेल चुकीचे : राजेंद्र शिंगणे  - Food and Drug Minister Rajendra Shingane criticizes BJP | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचे नेते रेमडेसिव्हिर सरकारला देणार होते, हे सपशेल चुकीचे : राजेंद्र शिंगणे 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 21 एप्रिल 2021

राज्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शन खरेदीवरुन मोठे राजकारण सुरु आहे.

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, राज्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शन खरेदीवरुन मोठे राजकारण सुरु आहे. मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकांची चौकशी केल्यानंतर राज्याच्या अन्न व औषध खात्याच्या मंत्र्यांच्या सहमतीनेच रेमडेसिव्हिरची खरेदी केली जाणार होती, असा दावा भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला होता. हा दावा राज्याचे अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी फेटाळून लावला आहे. कोणत्याही पक्षाला रेमडेसिव्हिर विकण्याचा अधिकार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

रुग्णसंख्या वाढल्यानंतर रेमडेसिव्हिरचा तुटवडा जाणवू लागला होता. त्यातच ब्रुक फार्मा कंपनीने रेमडेसिव्हिरचा साठा केल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यावरून ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून घेतले होते. त्यावरुन भाजप व राष्ट्रवादीमध्ये मोठे राजकारण रंगले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॅाकडाऊनबाबत केंद्र सरकारची भूमिका केली स्पष्ट

राजेंद्र शिंगणे यांच्या परवानगीनेच रेमडेसिव्हिरची खरेदी केली जाणार होती, असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले होते. त्याला आता राजेंद्र शिंगणे यांनी ट्वीट करत उत्तर दिले आहे. शिंगणे म्हणाले, ''भाजप रेमडेसिव्हिर विकत घेऊन मला देणार होते, अशी उलट सुलट चर्चा समाज माध्यम व सोशल मीडियावर सुरू असून ते सपशेल चुकीचे आहे. कोणत्याही पक्षाला रेमडेसिव्हिर वाटण्याचा अधिकार नाही. भाजपच्या काही लोकांनी त्यांच्या पुरवठादारांकडून रेमडेसिव्हिर खरेदी करण्यासाठी संपर्क केला होता. ते लोक मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. रेमडेसि

व्हिरचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,'' असे शिंगणे यांनी स्पष्ट केले आहे. 

 

भाजपच्या काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधला होता. तुम्ही आमच्या सप्लायरकडून रेमडेसिव्हिर खरेदी करावीत, असे त्यांनी मला सांगितले. आता ते मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही शिंगणे म्हणाले. 

रेमडिसिव्हिर इफेक्ट : FDA आयुक्त अभिमन्यू काळेंना हटवले; सर्व मंत्र्यांचे चेहरे उजळले!
 

अभिमन्यू काळे यांची बदली…

रेमडेसिव्हिरच्या पुरवठ्यावरून राजकारण तापले आहे. त्यामुळे राज्य सरकारने अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची मंगळवारी बदली केली आहे. काळे यांची बदली केल्यावरूनही राजकारण सुरू झाले आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काळे यांच्या बदलीचे स्वागत केले आहे. तर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या निर्णयावर टीका केली आहे.

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख