सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण; एनसीबीच्या निशाण्यावर ५० सेलिब्रिटी - Fifty Celebrities Name on NCB Radar for Drugs Use | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण; एनसीबीच्या निशाण्यावर ५० सेलिब्रिटी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. त्यानुसार एनसीबीच्या चौकशीत दीपिका, सारा अली खान, श्रद्धा कपूर अशा आघाडीच्या अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. या सर्वांना चौकशीसाठी समन्स पाठविले आहेत

मुंबई  : अभिनेता सुशांतसिंग राजपूत याला अमली पदार्थ दिल्याप्रकरणी चौकशी करणाऱ्या केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) तपास बॉलीवूडमधील कलाकारांवर केंद्रीत केला आहे. त्यानुसार तब्बल ५० सेलिब्रिटी त्यांच्या रडावर आहेत. त्यानुसार समन्स बजावलेल्या अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि सारा अली खान काल गोव्यातून मुंबईत दाखल झाल्या आहेत. दरम्यान काही वेळापूर्वी अभिनेत्री रकुलप्रीत सिंग काही वेळापूर्वीच एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाली आहे.

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. त्यानुसार एनसीबीच्या चौकशीत दीपिका, सारा अली खान, श्रद्धा कपूर अशा आघाडीच्या अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. या सर्वांना चौकशीसाठी समन्स पाठविले आहेत. दीपिकाची आज (ता. २५) चौकशी होणार आहे, असे कळवण्यात आले होते; परंतु तिने शनिवारी चौकशीसाठी येणार असल्याचे आता स्पष्ट केले आहे. सारा अली खानचीही याच दिवशी चौकशी होणार आहे. या दोघी काल गोव्यातून मुंबईत दाखल झाल्या. तसेच या सर्वांची नावे जया साहाच्या चौकशीतून समोर आली आहेत.

सुशांतने सारासह 'केदारनाथ' चित्रपटात काम केले होते. रियाने आपल्या जबाबात सांगितले की, केदारनाथ चित्रपटादरम्यान सुशांत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ घेत होता. दरम्यान, आता या प्रकरणी सुमारे ५० सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. यामध्ये अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक आणि बी ग्रेड सिनेमांच्या निर्मात्यांची नावे सामील आहेत. या प्रकरणात आधीच रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि इतर अनेकांना अटक करण्यात आली आहे; तर आज फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटाचीही एनसीबी चौकशी करत आहे. एनसीबी १५/२० क्रमांकाच्या गुन्ह्यांत दीपिका पादुकोण, करिश्‍मा प्रकाश आणि रकुलप्रीत सिंग यांची चौकशी करणार आहे. तर १६/२० क्रमांकाच्या गुन्ह्यांत श्रद्धा कपूर आणि सारा अली खानची नावे आहेत.

Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख