रिलायन्स कार्यालयावर आज शेतकरी संघटनांचा मोर्चा - Farmers Morcha on Reliance office Today | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार म्हणतात, "मला वाटतं मुख्यमंत्री व्हावं, कुणी करणार का.."
धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार मागे

रिलायन्स कार्यालयावर आज शेतकरी संघटनांचा मोर्चा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने आज (ता. २२) वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्‍स येथे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कॉर्पोरेट कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे

मुंबई  : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने आज (ता. २२) वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्‍स येथे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कॉर्पोरेट कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चात कामगार, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, हमाल पंचायतीचे प्रमुख बाबा आढाव, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर सहभागी होणार आहेत.

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतही शेतकऱ्यांच्या विविध संघटना एकत्र येणार आहे. हा मोर्चा रिलायन्सच्या कॉर्पोरेट कार्यालयावर धडकणार आहे. वांद्य्रातील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयापासून या मोर्चाची सुरुवात होणार आहे.

''केंद्र सरकारने संमत केलेल्या शेतकरीविरोधी तीनही कायद्यांचे बोलवते धनी अंबानी, अदानी आहेत. दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी अदानी, अंबानींच्या उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. याच धर्तीवर भविष्यात अंबानी, अदानी समूहाच्या सर्व सेवा आणि उत्पादने शेतकरी नाकारणार असून, देशाच्या खऱ्या मालकांना इशारा देण्यासाठी हा मोर्चा आहे,'' असे शेकापचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून या मोर्चाच्या नियोजनासाठी तयारी सुरू होती.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख