"" देशात प्रत्येक पंतप्रधानांनी फार मोठे बदल केले पण... यांनी आत्मनिर्भयचा शोध लावला '' 

सरकारला नवीन अर्थव्यवस्था मांडावी लागणार आहे. सरकारने थेट अनुदान दिल पाहिजे.
"" देशात प्रत्येक पंतप्रधानांनी फार मोठे बदल केले पण... यांनी आत्मनिर्भयचा शोध लावला '' 

मुंबई : मोदी सरकारने जाहीर केलेलं पॅकेज हा एक जुमला आहे. देशात प्रत्येक पंतप्रधानांनी फार मोठे बदल केले, त्यांची एक वेगळी ओळख आहे. मोदींनी आत्मनिर्भयचा शोध लावणं हे दुर्दैव असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. 

कोरोनाच्या संकटात 20 लाख कोटी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली तेव्हा आम्ही स्वागत केलं. मात्र अर्थमंत्र्यांनी 5दिवस प्रदीर्घ प्रेस घेतली त्यात आमची निराशा झाली.

त्यात कोणतीही मदत नाही तर फक्त कर्ज आहे. 20 लाख कोटी पैकी फक्त 2 लाख कोटी खर्च होणार आहे. बाकी सर्व कर्ज घेण्याचा सल्ला दिला आहे. तोट्यात गेलेल्या उद्योगांना बॅंक कर्ज देणार नाही असेही चव्हाण म्हणाले. 

चव्हाण यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की ही कर्ज घेतली की ती परत होणार नाही आणि पुन्हा त्याला माफ करावा लागेल. दुःखावर मीठ चोळण्याचा हा प्रयत्न आहे. पुढील वर्षात अर्थव्यवस्था उणे पाच टक्के होईल असं सांगितलं आहे.

सरकारला नवीन अर्थव्यवस्था मांडावी लागणार आहे. सरकारने थेट अनुदान दिल पाहिजे. करोनाच्या लढाईत सरकार कमी पडल आहे. खोदा पहाड और अशी अवस्था निर्मला सीतारामन यांची झाली आहे. 
सरकारला किती ही कर्ज काढावे लागले, नोटा छापाव्या लागल्या तरी अर्थचक्र थांबता कामा नये. 

याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनरेगीा खिल्ली उडवली होती. मोदींनी आता देशाची माफी मागितली पाहिजे. शेतकऱ्यांना ही थेट पैसे देण्यात यावे.कर्ज देऊन काही होणार नाही असेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com