Big Breaking - हितेंद्र व क्षीतिज ठाकूर यांच्या घर -निवासस्थानावर ईडीचा छापा - ED Raids Residence of Hitendra and Kshitij Thakur | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

Big Breaking - हितेंद्र व क्षीतिज ठाकूर यांच्या घर -निवासस्थानावर ईडीचा छापा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

अंडरवल्ड डाॅन भाई ठाकूर याच्याशी संबंधीत असलेल्या विवा ट्रस्ट आणि संबंधित कंपन्यांवर काही वेळापूर्वी सक्तवसुली संचनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. आमदार हितेंद्र ठाकूर व क्षीतिज ठाकूर यांच्याही घर व कार्यालयावर छापा टाकल्याची माहिती मिळत आहे. 

मुंबई : अंडरवल्ड डाॅन भाई ठाकूर याच्याशी संबंधीत असलेल्या विवा ट्रस्ट आणि संबंधित कंपन्यांवर काही वेळापूर्वी सक्तवसुली संचनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. आमदार हितेंद्र ठाकूर व क्षीतिज ठाकूर यांच्याही घर व कार्यालयावर छापा टाकल्याची माहिती मिळत आहे. 

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात ही कारवाई असून वसई, विरार, पालघर याठिकाणी विवा ग्रुपच्या संचालकांची घरे व कार्यालये आहेत. अशा पाच ठिकाणी सध्या छाप्याची कारवाई सुरु आहे. पीएमसी बँक प्रकरणात ईडीच्या रडारवर अनेक नेते आहेत. एचडीआयएल व त्यांच्या सहयोगी कंपन्यांकडून विवा ग्रुप ट्रस्ट व अन्य संबंधित कंपन्यांकडे काहीशे कोटी रुपये वळविले असल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. 

आमदार हितेंद्र ठाकूर हे विवा ट्रस्टचे अध्यक्ष असून क्षीतिज ठाकूर हे उपाध्यक्ष आहेत. विवा ट्रस्ट व संबंधित कंपन्यांवर भाई उर्फ जयेंद्र ठाकूर व त्याच्या कुटुंबियांचे नियंत्रण आहे. भाई ठाकूर हा दावूद इब्राहिमशी संबंधित असून त्याच्यावर यापूर्वी टाडाखाली कारवाई करण्यात आली आहे. त्याचे भाऊ आमदार हितेंद्र ठाकूर यांनी बहुजन विकास आघाडी स्थापन केली आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे राजेश पाटील, स्वतः हितेंद्र व क्षीतिज ठाकूर निवडून आले आहेत.
Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख