`भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्वप्न पडणे म्हणजे मानसिक आजार`

मोदी आणि शहा भेटीचे कवित्व अजून संपेना
sharad pawar -modi
sharad pawar -modi

नवी दिल्ली : महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी मिळून सरकार स्थापन होणार, अशी स्वप्ने पडणे आजार आहे, अशा शब्दांत शिवसेना नेता आणि खासदार संजय राऊत यांनी अशा चर्चा करणाऱ्यांना टोला लगावला. (Shivsena MP Sanjay Raut claims Mahavikas aghadi govt will completes five year term)

नवी दिल्ली येथे बोलताना राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीवर भाष्य केले. या बैठकीनंतर मी शरद पवार यांच्याशी संवाद साधल्याचे सांगत राऊत म्हणाले की तुम्हाला वाटते तसे राजकारण यात नाही. राज्यात नवी समीकरणे तयार होत असल्याची चर्चा आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार असे स्वप्न पडणे हा आजार आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष अमोल कोल्हे यांनी शरद पवारांच्या आशिर्वादावर ठाकरे सरकार असल्याचा उल्लेख केला होता. त्याबद्दल विचारले असता राऊत यांनी पवार हे  वयाने, अनुभवाने मोठे आहेत. त्यांचा आशिर्वाद सरकारला आहे. उद्धव  यांनी देखील हे  मान्य केले आहे. अमोल  कोल्हेंचा  टोन हा राणा  भीमदेव थाटाचा असेल. तीन  पक्षांशिवाय हे सरकार नाही .

संसदेच्या पावसाळी अधिवेशऩाच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की देशातील महागाई, कोविड, पेट्रोल दरवाढ , लडाखमध्ये चीनच घुसखोरी या  विषयावर संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधी पक्ष करणार आहे. ओबीसी , मराठा आरक्षणाचा मुद्दा पंतप्रधानसमोर उपस्थित करणार असून त्यावर ठोस निर्णय घेण्यास सांगू. 

भाजप आणि मनसे एकत्र येण्याचा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नसून अशी  समीकरणे राजकारणात होत असतात.  शिवसेनेचा झेंडा  खाली उतरणार नाही, असा दावा त्यांनी केला. मुन्नवर  राणा यांनी  योगी पुन्हा मुख्यमंत्री झाले तर आम्ही उत्तर प्रदेश सोडू, असे विधान केले होता. त्यावर या देशात राज्यकर्त्यांशी कितीही  मतभेद   असले  तरी  देशात कुणालाही असुरक्षित वाटू नये, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. 

राष्ट्रवादीनेही फेटाळले ते वृत्त

भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याचे वृत्त राष्ट्रवादीनेही काल फेटाळले होते. भाजप ही वॉशिंग मशीनसारखी झाली आहे. इथे डाकू पण साधू होवू शकतो असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना लगावला होता.

नारायण राणे हे कॉंग्रेसमध्ये असताना त्यांच्या परेल येथील एका इमारतीला ईडीने नोटीस दिल्याच्या बातम्या भाजपने पेरल्या होत्या. याशिवाय नारायण राणे अमित शहा यांना अहमदाबाद येथे भेटून आल्याचा व्हिडीओ राणे यांनी नकार दिल्यावर भाजपच्या लोकांनी व्हायरल केला होता.त्याचपध्दतीने बंगालमध्ये भाजपने लोक घेतले होते. म्हणजे ईडी, सीबीआय व इतर यंत्रणांच्या दबावाखाली आमच्या पक्षात या अशी परिस्थिती भाजप निर्माण करत आहे. त्यांच्या पक्षात गेल्यावर चौकशा बंद होतात. ही सत्य परिस्थिती आहे. नितीन गडकरीही वाल्या कोळयाचा वाल्मिकी करण्याची ताकद भाजपमध्ये असल्याचे बोलले होते याची आठवण नवाब मलिक यांनी करुन दिली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com