मोफत लसीकरणाबाबतची विधाने म्हणजे महाआघाडीतील नेत्यांचा बोलघेवडेपणा

महाविकास आघाडीचे नेते लसीकरण अभियानाचे महत्त्व समजून घेऊ शकलेले नाहीत.
Devendra Fadnavis criticizes the leaders of Mahavikas Aghadi on the issue of free vaccination
Devendra Fadnavis criticizes the leaders of Mahavikas Aghadi on the issue of free vaccination

मुंबई : केंद्र सरकारने सर्वांसाठी मोफत लसीकरणााचा कार्यक्रम घोषित केला आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यावरून मतगोंधळ असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ज्या राज्यांना लसीकरण मोहिमेला गती द्यायची असेल, त्यांना लस खरेदी करून ती वितरित करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, महाविकास आघाडीचे नेते लसीकरण अभियानाचे महत्त्व समजून घेऊ शकलेले नाहीत, असेही फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विलेपार्ले येथे नगरसेवक अभिजित सावंत यांच्या पुढाकाराने नित्यानंद हायस्कूलमध्ये उभारण्यात आलेल्या कोव्हिड केंद्राचे उद्घाटन केले, त्यानंतर फडणवीस बोलत होते. महाराष्ट्राला केंद्र सरकारने सर्वाधिक मदत केली आहे. तरीही या विषयावर महाविकास आघाडीतील नेते वेगवेगळी विधाने करीत आहेत. ही सर्व विधाने त्यांचा बोलघेवडेपणा दाखवत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा : हिंदूहृदयसम्राटांचा वारसा सांगणाऱ्यांनी टक्केवारीसाठी आता तो निर्णय मागे घेऊ नये 

मुंबई : राज्यातील नागरिकांना कोविडची मोफत लस देण्याच्या श्रेयासाठी महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी याबाबतची घोषणा करताच युवा सेनेचे प्रमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्याबाबतचे ट्विट केले हेाते. मात्र, काही वेळातच ते ट्विट डिलिट केले. त्यावरून भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी आदित्य यांना लक्ष्य केले आहे. वाटाघाटी आणि टक्केवारीसाठी या निर्णय आता मागे घेण्यात येऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,बिघाडी सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात. ‘ वाटाघाट ʼ आणि ‘टक्केवारीमुळेʼ लोकहितासाठी जाहीर केलेला संपूर्ण महाराष्ट्रासाठी ‘मोफत लसीकरणाचा निर्णय वापस घेऊ नये, हीच अपेक्षा, अशा शब्दांत आमदार गोपीचंद पडळकर यांनी आदित्य ठाकरे यांची खोड काढली आहे. 

दरम्यान, राज्यात लसीचा तुटवडा असताना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यातील सर्व नागरिकांना १ मे पासून मोफत लस देण्यात येणार आहे, त्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळात चर्चा झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी तातडीने ट्विट करत राज्यातील नागरिकांना आम्ही आमर्च कर्तव्य म्हणून मोफत लस देणार आहोत, असे म्हटले होते. मात्र, काही वेळानंतरच त्यांनी आपले ट्विट डिलिट केले हेाते. त्यावरून आमदार पडळकर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com