देशमुखांवर पुन्हा बाँब : बदली रॅकेटच्या सीबीआय चौकशीची फडणवीस करणार मागणी - Devendra Fadanavis Demands CBI Inquiry in Police Transfer Racket | Politics Marathi News - Sarkarnama

देशमुखांवर पुन्हा बाँब : बदली रॅकेटच्या सीबीआय चौकशीची फडणवीस करणार मागणी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 मार्च 2021

वरिष्ठ पोलिस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख  अडचणीत आले आहेत. आता फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केल्यानंतर देशमुख यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबई : गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बदल्यांच्या रॅकेटची जी चौकशी केली होती त्यात अनेक धक्कादायक नावे समोर आली आहेत. मुख्यमंत्र्यांकडे हा अहवाल तत्कालिन महासंचालकांनी सोपवूनही त्यावर कारवाई झालेली नाही. मी आज संध्याकाळी केंद्रीय गृहसचिवांशी याबाबत चर्चा करणार असून या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.(Devendra Fadanavis Demands CBI Inquiry in Police Transfer Racket)

वरिष्ठ पोलिस अधिकारी (Mumbai Pollice) परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) अडचणीत आले आहेत. आता फडणवीस (Devendra Fadanavis) यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केल्यानंतर देशमुख यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. आज फडणवीस म्हणाले, "२०१७ मध्ये मी मुख्यमंत्री व गृहमंत्री होतो. मला माहिती मिळाली होती की मुंबईच्या एका हाॅटेलात बदल्यांबाबत काही डिलिंग सुरु आहे. काही पोलिस अधिकारी जाणार आहेत असेही आम्हाला समजले होते. आम्ही प्लॅन आॅपरेशन केले. सर्वांना अटक करुन चार्जशीटही दाखल केले. माझ्या येण्याअगोदरही आर. आर. पाटील यांच्या काळातही रश्मी शुक्लाच गुप्तवार्ता आयुक्त होत्या. त्यांनीच २०२० मध्ये बदल्यांचे रॅकेट उघडकीला आणले होते,"

फडणवीस पुढे म्हणाले, "वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी काम करणारे एक रॅकेट मंत्र्यांचे नाव वापरते आहे. बदल्यांबाबत पोलिसांबरोबर थेट बोलणे होत आहे, अशी माहिती शुक्ला यांना मिळाली होती. त्यांनी हे महासंचालकांना कळवले.  नियमानुसार महासंचालकांनी एसीएस होम यांच्याकडे फोन इंटरसेप्शनची परवानगी मागितली. जेव्हा काॅल रेकाॅर्डिंग सुरु झाले त्यावेळी स्फोटक माहिती समोर आली. या साऱ्या गोष्टी बाहेर आल्यानंतर याचा संपूर्ण अहवाल शुक्ला यांनी २५ आॅगस्ट २०२० रोजी महासंचालकांना दिला. महासंचालकांनी २६ तारखेला त्यावेळी तत्कालिन गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचीव सीताराम कुंटे यांना पाठवला. मुख्यमंत्र्यांना तातडीने कळवणे गरज आहे. व सीआयडी चौकशी करण्याची गरज आहे, असे महासंचालकांनी त्यात नमूद केले होते,"

''माझ्या माहितीनुसार त्यानंतर याबाबत पूर्ण ब्रिफिंग मुख्यमंत्र्यांना (Uddhav Thackeray) दिले गेले. मुख्यमंत्र्यांनी त्यावर काळजीही व्यक्त केली होती. या संपूर्ण माहितीचा ६.३ जीबीचा डेटा माझ्याकडे आहे. ज्यात हे सारे काॅल्स आहेत. त्याचे ट्रान्सक्रिप्ट अहवालासह मुख्यमंत्र्यांना पाठवले गेले होते. जेव्हा लक्षात आले की यावर कारवाई झाली नाही, त्यावेळी चौकशी केली तेव्हा कळले हा अहवाल गृहमंत्र्यांकडे गेला आहे. त्यानंतर कारवाई झाली ती गुप्तवार्ता आयुक्तांवरच. त्यांचे महासंचालक पदाची बढती रोखली गेली. त्यांच्या खाली असलेल्यांना अॅडव्हान्स प्रमोशन दिले गेले,'' असेही फडणवीस म्हणाले. (Devendra Fadanavis Demands CBI Inquiry in Police Transfer Racket)

फडणवीस पुढे म्हणाले, "रश्मी शुक्ला यांना बढती दिली गेली ती महासंचालक नागरी संरक्षण विभाग म्हणून. त्यावेळी हे पदच अस्तित्वात नव्हते. सरकार पद निर्माण करु शकते. पण याबाबतीत मंत्रीमंडळाची मंजूरीही घेण्यात आली नव्हती. शुक्ला यांना एक दहा बाय दहाचे आॅफिस दिले गेले. शुक्ला यांनी जो अहवाल सादर केला होता. त्यावर जाणूनबुजून २५ आॅगस्टपासून आजपर्यंत कुठलीही कारवाई केली गेली नाही. उलट शुक्ला यांनी सादर केलेल्या अहवालामध्ये ज्यांची नावे आहेत, त्यांना ट्रानस्क्रिपक्टमध्ये नमूद केलेलीच पदे मिळाली आहेत,'' असाही आरोप फडणवीस यांनी केला. या साऱ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी आपण करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख