ओबीसी निर्णयावर सरकारनं स्टे मिळवावा - फडणवीस

सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्णय दिला. एक फार मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी ओबीसी उमेदवार निवडूण आले आहेत त्या ठिकाणी खुल्या वर्गात निवडणूक होणार आहे.एक मोठी अडचणीची परिस्थिती आता निर्माण झाली आहे. राज्य सरकारने आता सुप्रीम कोर्टात जाऊन याचिका दाखल करावी आणि स्टे घ्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
Devendra Fadanavis
Devendra Fadanavis

मुंबई : सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणासंदर्भात निर्णय दिला. एक फार मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी ओबीसी उमेदवार निवडूण आले  आहेत त्या ठिकाणी खुल्या वर्गात निवडणूक होणार आहे. एक मोठी अडचणीची परिस्थिती आता निर्माण झाली आहे. राज्य सरकारने आता सुप्रीम कोर्टात जाऊन याचिका दाखल करावी आणि स्टे घ्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. 

ओबीसी समाजासाठी असलेल्या २७ टक्के आरक्षणानुसारच जिल्हा परिषदेतील जागा निश्चित करून निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. याचा थेट परिणाम नागपूरसह अकोला, वाशीम, नंदूरबार व धुळे जिल्हा परिषदांवर होण्याची शक्यता आहे. लगेच न्यायालयाच्या आदेशाची पालन करण्याची वेळ आल्यास पुन्हा निवडणुकासुद्धा घ्याव्या लागणार आहेत. त्यावर आज बोलताना फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली.

ते म्हणाले, ''या संदर्भात तीन बाबींची पूर्तता करण्यात आलेली नाही. गेल्या १४ महिन्यांपासून कोणतेही कमिशन तयार केले नाही. कोर्टाने कमिशन तयार करण्यास सांगितल होतं. मात्र तसं कोणतंही कमिशन तयार करण्यात आलं नाही. एकीकडे मराठा आरक्षणासाठी आपण लढाई लढतोय. मात्र आता ओबीसी आरक्षणा संदर्भात सरकारने लढाई योग्य प्रकारे लढली नाही.उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की यावर आम्ही लवकर बैठक घेऊ. याबाबतीत सरकारला आम्ही पाहीजे ते सहकार्य करायला तयार आहोत,''

यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "अधिवेशन संपल्यानंतर उद्या आपण एकत्र बसून यावर काय मार्ग काढता येईल यावर चर्चा करू. ओबीसी समाजात भीती निर्माण झाली आहे. आयोग नेमायचा का यावरही चर्चा करू. काल सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा झाली आहे. याबाबत सुप्रीम कोर्टात भूमिका मांडण्यासाठी दिल्लीतील वकिलांचा ही सल्ला आम्ही घेऊ,"
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com