उपसभापती निवडणूक : न्यायालयात मागितली जाणार दाद? - Council Deputy Chairman Election BJP May Approach Court | Politics Marathi News - Sarkarnama

उपसभापती निवडणूक : न्यायालयात मागितली जाणार दाद?

मृणालिनी नानिवडेकर 
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

कोरोनाग्रस्त आमदारांना मतदानासाठी मुंबईत पोहोचणे शक्‍य नसल्याने विधान परिषद उपसभापती निवडणूक घेणे अयोग्य आहे. मतदानाच्या अधिकारावर त्यामुळे अंकुश येत असल्याची भूमिका घेत भाजप न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.

मुंबई  : कोरोनाग्रस्त आमदारांना मतदानासाठी मुंबईत पोहोचणे शक्‍य नसल्याने विधान परिषद उपसभापती निवडणूक घेणे अयोग्य आहे. मतदानाच्या अधिकारावर त्यामुळे अंकुश येत असल्याची भूमिका घेत भाजप न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. काल सर्वपक्षीय बैठकीत या संबंधीचे सूतोवाच भाजपनेत्यांनी केल्याची माहिती महाविकास आघाडीच्या एका नेत्याने दिली. 

युती सरकारच्या काळात उपसभापतिपदाची निवडणूक घेण्यास जो विलंब लावला होता, ते स्मरा, असेही काल सांगण्यात आले आहे. आमदारांना ऑनलाईन मतदानाचा अधिकार द्या, अन्यथा निवडणूक पुढे ढकला, असे या याचिकेचे स्वरूप असेल, असेही समजते. विधानसभेतील पिठासीन अधिकाऱ्यांची दोन्ही पदे शिवसेनेकडे नाहीत. परिषदेचे सभापतिपदही राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असल्याने या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही होते. 

मात्र, किती आमदार साथ देतात, हजर राहतात हे पाहूनच निवडणुकीचा निर्णय घेण्यात आला. परवा रात्री महाविकास आघाडीच्या बैठकीला हजर राहिलेले आमदार बघून काल निवडणूक घोषित करण्यात आली आहे. सदस्यांच्या नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित आहे. तो मार्गी लागण्यापूर्वीच निवडणूक घेणे आणि विजयी होणे सेनेसाठी आवश्‍यक मानले जाते.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख