मुंबईच्या रुग्णालयांचे ८० टक्के बेडस् कोरोनाग्रस्तांसाठी ठेवण्याची शिफारस - Corona Task Force gives Suggestions to Maharashtra Government | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

मुंबईच्या रुग्णालयांचे ८० टक्के बेडस् कोरोनाग्रस्तांसाठी ठेवण्याची शिफारस

राजू सोनवणे
शुक्रवार, 15 मे 2020

राज्य सरकारने मुंबईतील कोरोनाचे वाढते रुग्ण त्यास्तही करावयाच्या उपाययोजना यासाठी डॉ.संजय ओक यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमला आहे. या टास्क फोर्सने कोरोनाबाबत करण्याच्या उपाययोजनांबाबत विविध शिफारसी राज्य सरकारकडे केली आहे

मुंबई :  मुंबईतील वाढली कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या पाहता मुंबईतील खासगी आणि सरकारी रुग्णालयातील ८० टक्के बेडस् हे कोरोना ग्रस्त रुग्णांसाठी ठेवावेत अशी शिफारस टास्क फोर्सने राज्य सरकारकडे केलेली आहे

राज्य सरकारने मुंबईतील कोरोनाचे वाढते रुग्ण त्यास्तही करावयाच्या उपाययोजना यासाठी डॉ.संजय ओक यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमला आहे.  मुंबईत सध्या खासगी आणि सरकारी रुग्णालय मिळून  एकूण ३० हजार बेड आहेत.  त्यातील ८० टक्के बेड म्हणजे २२ हजार हे फक्त कोविड रुग्णांसाठी ठेवावे अशी शिफारस आहे. टास्क फोर्समधील काही सदस्यांच्या मते साठ टक्के बेड जरी कोविड साठी दिले तरी चालण्यासारखे आहे. 

त्यामुळे साठ ते ऐशी टक्के बेड हे कोविड रुग्णांसाठी असावेत, तसेच ह्या बेड मधील वीस टक्के बेड रुग्णांना देण्याचे अधिकार सरकारकडे असावेत, अशीही शिफारस करण्यात आली आहे. सध्या अनेक रुग्ण बेड मिळत नसल्याची तक्रार करतात.  त्यामुळे राज्य सरकारकडे बेड देण्याचे अधिकार असावेत, असे सांगण्यात आले आहे. 

अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरु करा

सध्या सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे रुग्णालये पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील या कर्मचाऱ्यांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याची शिफारस  टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांकडे केलीआहे. तसेच आयुर्वेदिक टास्क फोर्स नेमण्याची ही शिफारस मुख्यमंत्र्यांना केली असून ती मागणी मान्य झाली आहे.

लाॅकडाऊन वाढणार

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत नसल्याने लाॅकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्याची तयारी सुरु आहे. काल याबाबत महाविकास आघाडीची बैठक झाली. ग्रीन झोनमधील उद्योग सुरु करुन अन्यत्र लाॅकडाऊन ठेवण्याबाबत या बैठकीत एकमत झाले. मात्र, केंद्र सरकार याबाबत काय निर्णय घेणार हे पाहून पुढील पावले उचलली जाणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मुंबई पुण्याबरोबरच अन्य शहरांत कोरोनाबाबत अडचणी येत असल्याने व्यवहार पूर्णपणे सुरु ठेवण्याचा प्रश्नच येत नसल्याबद्दल या चर्चेत निष्कर्ष निघाल्याचे सांगण्यात येत आहे. 

'बेस्ट'ने केल्या उपाययोजना

दरम्यान, मुंबईच्या 'बेस्ट' उपक्रमाने आपल्या कर्मचाराऱ्यांसाठी काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे; 

1)  बेस्ट कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्वरित त्या कर्मचाऱ्यांच्या एका नातेवाईकाला बेस्टच्या सेवेत नोकरीवर घेणार
2)  कामावर उपस्थित असणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना प्रत्साहन भत्ता म्हणून 300 रुपये देणार

कोरोनाच्या धर्तीवर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी फेसशील्ड दिले जाणार असून या आधी या कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर देण्यात आलेत

रुग्णालय कर्मचाऱयांना ने आण करणाऱ्या बेस्ट बसेस मध्ये कंडक्टर आणि वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी , ड्रायव्हर केबिन प्लास्टिक आवरणाने झाकली जाणार आहे .

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख