कोरोनाचा विस्फोट -राज्यात 39,544 नवे रुग्ण; तर 227 मृत्यू - Corona Cases Rising Tremendously in Maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोनाचा विस्फोट -राज्यात 39,544 नवे रुग्ण; तर 227 मृत्यू

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 एप्रिल 2021

राज्यात कोरोना रूग्णांचा विस्फोट झाला असून काल 39,544 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 28,12,980 झाली आहे. तर आज राज्यात मृत्यूने देखील थैमान घातले असून काल तब्बल 227 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांचा विस्फोट झाला असून काल 39,544 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना (Corona) बाधित रुग्णांची एकूण संख्या 28,12,980 झाली आहे. तर आज राज्यात (Maharashtra) मृत्यूने देखील थैमान घातले असून काल तब्बल 227 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. Corona Cases Rising Tremendously in Maharashtra

मुंबई (Mumbai) 5398 , पुणे (Pune) मनपा 4502, पिंपरी चिंचवड 2214, नागपूर मनपा 2114 आणि नाशिक (Nashik) मनपा 2941 येथे सर्वाधिक रुग्णवाढ झाली आहे. तर मुंबई मनपा 15 पुणे मनपा 18, नागपूर मनपा 31 तर उर्वरित नागपूर (Nagpur) 18 मृत्यूंची नोंद झाली.आज झालेल्या 227 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. 

काल नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 129 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 61 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित 37 मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.94 % एवढा आहे. काल 23,600 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 24,00,727 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. Corona Cases Rising Tremendously in Maharashtra

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.34 % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण 3,56,243 अॅक्‍टिव्ह रुग्ण आहेत.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,97,92,143 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 28,12,980 (14.21 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 17,29,816 व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत तर 17,863 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख