विधानसभा अध्यक्ष तात्काळ निवडीवरून आघाडीत मतभेद? - Congress wants Assembly Chairman Election at once | Politics Marathi News - Sarkarnama

विधानसभा अध्यक्ष तात्काळ निवडीवरून आघाडीत मतभेद?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 मार्च 2021

विधानसभा अध्यक्षांची निवड केव्हा घ्यावी यावरुन राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे चित्र आहे. ही निवडणूक तात्काळ घ्यावी, अशी काँग्रेस नेत्यांची भूमीका आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या भूमीकेला दुजोरा दिला आहे. 

मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवड केव्हा घ्यावी यावरुन राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे चित्र आहे. ही निवडणूक तात्काळ घ्यावी, अशी काँग्रेस नेत्यांची भूमीका आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या भूमीकेला दुजोरा दिला आहे. 

पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अध्यक्षपद रिक्त आहे. हे पद कधी भरणार याची विचारणा राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनीही केली आहे. विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. त्यामुळे ही निवडणूक तातडीने घेण्याबाबत काँग्रेस आग्रही आहे. मंत्रीमंडळात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुळात कमी खाती आहेत. त्यात आता अध्यक्षपद रिक्त आहे. सध्या हंगामी अध्यक्षपद हे उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवळ यांच्याकडे आहे. 

आता अध्यक्षपदाबाबात महाविकास आघाडीच्या नेत्यांची लवकरच बैठक होणार असून त्यात ही निवडणूक तात्काळ घ्यावी, अशी भूमीका काँग्रेस मांडणार असल्याचे समजते. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपद निवडणूक याच आठवड्यात व्हावी, अशी आमची मागणी असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख