पक्षाच्या मंत्र्यांनो आतातरी अधिकार वापरा - काँग्रेसच्या बैठकीत सूर - Congress in Maharashtra Worried about Governments Image | Politics Marathi News - Sarkarnama

पक्षाच्या मंत्र्यांनो आतातरी अधिकार वापरा - काँग्रेसच्या बैठकीत सूर

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 24 मार्च 2021

सचिन वाझे ,मनसुख हत्या आणि बदल्यातील कोटयावधींच्या उलाढालींची चर्चा महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करते आहे. श्रेष्ठींना तसा अहवाल पाठवण्याचे काल कॉंग्रेसच्या बैठकीत निश्चित झाल्याचे समजते.

मुंबई : सचिन वाझे ,मनसुख हत्या आणि बदल्यातील कोटयावधींच्या उलाढालींची चर्चा महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करते आहे. श्रेष्ठींना तसा अहवाल पाठवण्याचे काल कॉंग्रेसच्या बैठकीत निश्चित झाल्याचे समजते. ही प्रतिमा सुधारावी, यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी आपला अधिकार वापरावा, असेही या बैठकीत सांगण्यात आले आहे. (Congress in Maharashtra Worried about Governments Image)

कॉंग्रेसला या संबंधात वाटणारी चिंता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना कळवणे आवश्यक वाटत असून काही नेत्यांनी तर अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh)गृहमंत्रीपदाचा राजीनामा  देणे उचित ठरेल, असे सांगितल्याचे समजते.  महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा विचार योग्य होता असे मत पुन्हा एकदा मांडले गेले आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची (Indian National Congress) कामगिरी चांगली असण्याची शक्यता असतानाच महाराष्ट्रातील आरोप प्रत्यारोपांचे वादळ प्रश्न निर्माण करते आहे. 

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे या सरकारबद्दलचे तेंव्हाचे मत लक्षात घेता येथील घडामोडींची माहिती त्यांना सतत देण्याचा निर्णय घेण्यात आला. 'रॉयल स्टोन' या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला सुनिल केदार ,विश्वजित कदम, अस्लमशेख, के.सी.पाडवी या मंत्र्यांबरोबरच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ,चरणजितसिंग सप्रा ,सचिन सावंत हे नेते हजर होते. (Congress in Maharashtra Worried about Governments Image)

ज्येष्ठ मंत्र्यांनी अधिकार वापरावा 
सरकारच्या प्रतिमेबद्दल चिंता व्यक्त केली जाते आहे. त्यात कॉंग्रेस पक्ष भरडला जावू नये अशी अपेक्षा व्यक्त केली गेली. ही प्रतिमा सुधारण्यासाठी मंत्रिमंडळातील कॉंग्रेसच्या ज्येष्ठ सदस्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करावा अशी अपेक्षा असल्याचेही यावेळी ठासून सांगण्यात आले.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख