भाजपचे तोंड काळे होण्याची सुरुवात : सचिन सावंत - Congress Leader Sachin Sawant Targets BJP over AIIMS Report in SSR Case | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचे तोंड काळे होण्याची सुरुवात : सचिन सावंत

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

एम्सचा अहवाल आल्यानंतर भाजपचे तोंड काळे झाले आहे. भाजपने जो कट केला होता तो उघड झाला आहे. गुप्तेश्वर पांडेंना स्वेच्छानिवृत्ती उगाच नाही मिळाली. मुंबई पोलिसांना ज्या घाणेरड्या पद्धतीने बदनाम केले गेले, महाराष्ट्राचा अपमान केला गेला त्यातून महाराष्ट्राची जनता भाजपला माफ करणार नाही, असे सचिन सावंत यांनी ट्वीट करुन म्हटले आहे

मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील व्हिसेरा तपासणीच्या अहवालाचे निष्कर्ष एम्सच्या तज्ज्ञांनी सीबीआयकडे सोपवले आहेत. सुशांतचा खून झाला नाही, असा एम्सचा निष्कर्ष असल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. त्यावरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. 

एम्सचा अहवाल आल्यानंतर भाजपचे तोंड काळे झाले आहे. भाजपने जो कट केला होता तो उघड झाला आहे. गुप्तेश्वर पांडेंना स्वेच्छानिवृत्ती उगाच नाही मिळाली. मुंबई पोलिसांना ज्या घाणेरड्या पद्धतीने बदनाम केले गेले, महाराष्ट्राचा अपमान केला गेला त्यातून महाराष्ट्राची जनता भाजपला माफ करणार नाही, असे सचिन सावंत यांनी ट्वीट करुन म्हटले आहे. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युचा राजकीय कारणांसाठी उपयोग करण्याचे पाप भाजपला महागात पडेल, असेही सावंत यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

संबंधित लेख