केंद्राचा 'तो' निर्णय 'एप्रिल फूल' पण असू शकतो!  - Congress Leader Ashok Chavan Ridicules Center for Interest Rates Decission | Politics Marathi News - Sarkarnama

केंद्राचा 'तो' निर्णय 'एप्रिल फूल' पण असू शकतो! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 एप्रिल 2021

बचत खात्यांच्या व्याजदरातील कपात मागे घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय 'एप्रिल फूल' पण असू शकतो, असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी लगावला आहे. केंद्र सरकारने बचत खात्यांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय बुधवारी घेतला होता. 

मुंबई : बचत खात्यांच्या व्याजदरातील कपात मागे घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय 'एप्रिल फूल' पण असू शकतो, असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी लगावला आहे.केंद्र सरकारने बचत खात्यांवरील (Saving Account) व्याजदरात कपात करण्याचा निर्णय बुधवारी घेतला होता. Congress Leader Ashok Chavan Ridicules Center for Interest Rates Decission

गुरूवारी त्यासंदर्भातील वृत्त सर्वच वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाले होते. परंतु, गुरूवारी सकाळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitaraman) यांनी ट्वीट (Tweet) करून हा निर्णय मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले. परंतु, केंद्राच्या या निर्णयावर चव्हाण यांनी शंका व्यक्त केली आहे. ''व्याजदर कपातीचा निर्णय नजरचुकीने वगैरे घेण्यात आलेला नाही. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर हा निर्णय मागे घेण्यात आला असावा. परंतु, आज १ एप्रिल आहे. हे 'एप्रिल फूल' पण असू शकते. निवडणूक संपल्यावर कदाचित आज मागे घेतलेला निर्णय पुन्हा लागू केला जाऊ शकतो,'' असे अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे.

अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपात करण्याचा आपला निर्णय नरेंद्र मोदी सरकारने अवघ्या चोवीस तासांत मागे घेतला आहे. त्यामुळे आता २०२० -२०२१ मध्ये असलेले व्याजदरच कायम राहणार आहे. हा निर्णय घेतल्याने मोदी सरकारवर मोठी टीका झाली. त्यानंतर नजरचुकीने हा निर्णय घेतल्याचे सांगत तो मागे घेण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी आपल्या ट्वीटर हँडलवरुन ही माहिती दिली. Congress Leader Ashok Chavan Ridicules Center for Interest Rates Decission

काल 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष 2020-2021 ची समाप्ती झाली. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस मोदी (Narendra Modi) सरकारने सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला होता. सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरात (Interest Rates)  मोठी कपात केली आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने केलेल्या या कपाती मुळे सामान्यांना धक्का बसला  होता. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख