Big Breaking काही ठिकाणी लाॅकडाऊनचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

राज्यात कोरोनाचे संकट वाढत असल्याने काही ठिकाणी नाईलाजाने काही भागांमध्ये लाॅकडाऊन करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. लोक कोरोनाविषयक नियम पाळत नसल्याने हा निर्णय घ्यावा लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
CM Uddhav Thackeray got corona Vaccine in Mumbai
CM Uddhav Thackeray got corona Vaccine in Mumbai

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट वाढत असल्याने काही ठिकाणी नाईलाजाने काही भागांमध्ये लाॅकडाऊन करण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. लोक कोरोनाविषयक नियम पाळत नसल्याने हा निर्णय घ्यावा लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

ठाकरे यांनी आज जे जे रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या समवेत होते. लस घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वरीलप्रमाणे विधान केले. आज मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांच्या मातुश्री यांनाही कोरोनाची लस देण्यात आली. मिलिंद नार्वेकर यांनाही आज कोरोनाची लस देण्यात आली. लसीकरण वेगाने होत असले तरी लोक नियम पाळत नसल्याने कोरोनाची संख्या वाढत आहे. त्यामुळे येत्या एक दोन दिवसांत बैठक घेऊन त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान,  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागपूरमध्ये १४ ते २१ मार्च या काळात लाॅकडाऊन करण्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली. या लाॅकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा बंद राहणार आहेत. दवाखाने, बँका सुरु राहणार असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.

नागपूरमध्ये १ लाख ६२ जणांना वर्षभरात कोरोनाची लागण झाली आहे. ४२१५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आताही नागपूरमध्ये कोरोनाची संख्या वाढत असल्याने नाईलाजाने लाॅकडाऊनचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. २४ तासात शहरात १७०० रुग्णसंख्या झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

होम क्वारंटाईन असलेल्यांनी बाहेर पडू नये असे आवाहन त्यांनी. पोलिसांना कडक संचारबंदीचे आदेश देण्यात आले असून.  नागरिकांना विनाकारण फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांना कडक संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत, असेही राऊत यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com