उद्धव ठाकरे - गडकरी आज भेटणार; अजित पवारही राहणार बैठकीला उपस्थित

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी पाच वाजता राष्ट्रीय महामार्गांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती गडकरी यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
Uddhav thackeray - Nitin Gadkary - Ajit Pawar
Uddhav thackeray - Nitin Gadkary - Ajit Pawar

मुंबई : महाविकास आघाडी सरकारवर भाजपचे राज्यातील नेते दररोज आरोप करत असताना आज केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी सह्याद्री अतिथीगृहात चर्चा करणार आहेत. 

सध्या राज्यात महाविकास आघाडीतले घटक पक्ष आणि विरोधात असलेला भाजप यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न, मेट्रो कारशेडचा मुद्दा, राज्याच्या पोलिस महासंचालयांनी मागितलेली प्रतीनियुक्ती अशा विविध मुद्यांवरुन उभयतांत शाब्दिक हल्ले सुरु आहेत. भाजपने विशेषतः शिवसेनेला लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये काय चर्चा होणार याची उत्सुकता आहे.

एका बाजूला भाजप शिवसेनेवर हल्ले करत असताना दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे नेते दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन भाजपला लक्ष्य बनवत आहेत. शिवसेना नेते प्रताप सरनाईक, खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत, भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांना आलेल्या ईडीच्या नोटिसांवरुन शिवसेना भाजपच्या विरोधात आक्रमक झाली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी पाच वाजता राष्ट्रीय महामार्गांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती गडकरी यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तरीही या बैठकीत उपस्थित राहणाऱ्या नेत्यांची नांवे पाहता राजकीय वर्तुळातली उत्सुकता संपलेली नाही.
Edtied By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com