राज्यपालांच्या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे अऩुपस्थित; पण नार्वेकर हजर राहिल्याने भुवया उंचावल्या..

राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांच्याकडे होणाऱ्या बैठकांत राजशिष्टाचार महत्त्वाचा असतो.
CM absent for meeting conveyed by governoa but narvekar was leading delegation
CM absent for meeting conveyed by governoa but narvekar was leading delegation

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सांयकाळी सात वाजता बोलविलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले. मुख्य सचिव अजोय महेता ,पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल ,संजय कुमार ,नितीन करीर ,भूषण गगरानी हे मंत्रालयातील अधिकारी मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल, सेनानेते मिलिंद नार्वेकर या बैठकीला हजर होते.

राज्यपालांनी निमंत्रण देऊनही मुख्यमंत्री ठाकरे हे अनुपस्थित राहिले. पण त्यांचे दूत म्हणून नार्वेकर यांनी हजेरी लावली. नार्वेकर यांच्याकडे तसे थेट शासकीय पद नाही. मात्र  तरीही प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांची उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावून गेली. विरोधी पक्षनेते देेेवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेत्यांनी राज्यपालांची काल भेट घेऊन ठाकरे सरकार कोरोनाची परिस्थिती नीट हाताळत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर राज्यपालांनी आज बैठक बोलविली. अर्थात या आधी पण राज्यपालांनी कोरोनाच्या परिस्थितीचा राजभवनावर आढावा घेतला होता.  त्या वेळी मुख्यमंत्र्यासोबत नार्वेकर हजर होते. मात्र स्वतः न येऊन नार्वेकरांकडे कोणतेही पद नसताना त्यांना राजभवनावर पाठविण्यामागचे कारण अनेकांना कळाले नाही. 

ठाकरे सरकारविरोधात भाजप आक्रमक

मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि मालेगावमध्ये परिस्थिती गंभीर आहे. मुंबईमध्ये तर चाळीस हजारापेक्षा रुग्ण आहेत आणि मृताचा आकडा जवळजवळ तेराशेच्या पुढे गेला असल्याचे खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच म्हटले होते. कोरोनाच्या संकटात आतापर्यंत भाजप नेते काहीसे शांत होते पण, कालपासून ठाकरे सरकारविरोधात फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील यांनीही दंड थोपटण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे आघाडी सरकार विरोधी भाजप असा सामना कोरोनाच्या मुद्यावरून रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. 

कोरोनाच्या संकटात भाजपने राज्य सरकारला सहकार्य करण्याचीच भूमिका घेतली. मात्र या सरकारने चांगली कामगिरी केली नाही. या सर्व गोष्टाकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या 22 मे 2020 रोजी भाजपतर्फे "मेरा अंगण, मेरा रणांगण, महाराष्ट्र बचाव' आंदोलन करण्यात येणार असून सोशल डिस्टनिंग पाळून राज्यभर ठाकरे सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. पाटील यांच्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. दुसरीकडे ट्‌विटर वॉरही सुरू झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. भाजपचे दुसरे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी तर ठाकरे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com