Breaking - वाझे प्रकरणात आणखी एका एपीआयला अटक

सचिन वाझे प्रकरणात एनआयएने मुंबई पोलिसांच्या क्राईम इंटिलिजन्स युनिटचा सहाय्यक निरिक्षक रियाज काझीला अटक केली आहे. अंटिलिया बाँब प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पुरावे नष्ट केल्याचा रियाझ काझीवर आरोप आहे
Riyaz Kazi Sachin Waze
Riyaz Kazi Sachin Waze

मुंबई : सचिन वाझे प्रकरणात एनआयएने NIA मुंबई पोलिसांच्या Mumbai Police क्राईम इंटिलिजन्स युनिटचा CIU सहाय्यक निरिक्षक रियाज काझीला अटक केली आहे. अंटिलिया बाँब प्रकरण व मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पुरावे नष्ट केल्याचा रियाझ काझीवर आरोप आहे. रियाज काझी याची अनेक दिवसांपासून एनआयए कार्यालयात तासनतास चौकशी सुरु होती. रियाजसह अनेक अधिकाऱ्यांचीही एनआयए चौकशी करत आहे. CIU Officer Riyaz Kazi Arrested by NIA in Sachin Waze Case

रियाज काझी हा ज्या सीआययू विभागात काम करत होता, त्याचे नेतृत्व सचिन वाझे Sachin Waze करत होता. एनआयएने या संपूर्ण कार्यालयाची झडतीही घेतली होती. सचिन वाझेला अटक झाल्यानंतर एनआयएचे अधिकारी रियाज काझीला बोलावून वारंवार त्याच्याकडे चौकशी करत होते. अखेर आज त्याला अटक करण्यात आली. 

दरम्यान, दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ANil Deshmukh यांचे दोन स्वीय सहाय्यक संजीव पालांडे व कुंदन या दोघांना सीबीआयच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. या दोघांनाही सीबीआयने CBI समन्य बजावले आहे. या दोघांकडे चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवली जाणार आहेत. CIU Officer Riyaz Kazi Arrested by NIA in Sachin Waze Case

ता. ४ मार्चला झालेल्या बैठकीत अनिल देशमुख यांचे पीए संजीव पालांडे यांनी डीसीपी डाॅ. राजू भुजबळ यांना २ ते ३ लाख रुपये हप्ता वसूल करण्यास सांगितले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. त्यामुळे पालांडे यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. त्याचबरोबर कुंदन यांनाही सीबीआयने चौकशीसाठी समन्य पाठवले आहे. 
Edited By - Amit Golwalkar


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com