...असा दुतोंडी विरोधी पक्ष महाराष्ट्राने आजवर पाहिला नव्हता : ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल 

देश विकायला काढणारे म्हणून तुमचीही नोंद होईल याचे भान ठेवा.
Chief Minister Uddhav Thackeray criticizes Leader of Opposition Devendra Fadnavis
Chief Minister Uddhav Thackeray criticizes Leader of Opposition Devendra Fadnavis

मुंबई : विरोधी पक्षनेत्यांची कीव करावीशी वाटते. कारण, संपूर्ण देशात ज्या पद्धतीने महाराष्ट्राने कोविडविरोधात पाऊले उचलली. सर्वांत चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न केला. ज्या लढ्याचे किंबहुना धारावी पॅटर्नचे जागतिक पातळीवर कौतुक झाले. ते कौतुक तुम्ही सरकारचे म्हणून करू नका. पण त्या योद्धांमध्ये ज्याला आपण कोविड योद्धे म्हणतो. त्यांची तुम्ही थट्टा करताय. त्यांचे शौर्य तुम्ही नाकारता आहात आणि दुसरीकडे फोटो आला पाहिजे म्हणून दोन कोविड योद्धांचा सत्कार करता आहात. हा असा दुतोंडी विरोधी पक्ष महाराष्ट्राने कधी आजवर अनुभवला नव्हता, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लोबाल केला. 

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी (ता. 28 फेब्रुवारी) मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांसमवेत पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्यांनी फडणवीस यांनी कोविड काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्याला ठाकरे यांनी उत्तर दिले. 

ते म्हणाले की, हल्ली कशात काही नसताना आरोप करण्याची राजकारणाची पद्धत रुढ होत आहे. आजच्या एवढा दुतोंडी विरोधी पक्ष महाराष्ट्राने कधीही पाहिला नव्हता. विरोधी पक्षाने सीमाप्रश्‍नावर सरकारशी सहकार्याची भूमिका मांडली आहे. पण, गेल्या पाच वर्षांपासून तुम्ही राज्य, केंद्रात सत्तेत होता. तेव्हा हा प्रश्‍न का सोडविला नाही. आता आमच्यासोबत एकत्र येणार असाल तर आनंदच आहे. पण, बोलाचीच कढी, बोलाचाच भात अशी पद्धती त्यांनी अवलंबून नये. 

मराठा आरक्षणावर सहकार्याची भूमिका घेतली, त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो. भाजपची कर्जमाफी आतापर्यंत चालू होती. त्यावेळी जो त्रास शेतकऱ्यांना झाला. तो आमच्या कर्जमाफीत आम्ही ठेवला नाही. अधिवेशन असल्यामुळे काहीतर बोलायचे म्हणून ते बोलून गेले असावेत, सगळंच काही जोरात बोललं म्हणजे खरं असतं असं काही नसतं, असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना घेतला. 

केंद्र सरकार कर रूपाने राज्यांना ओरबडतंय. पण राज्याच्या हक्काचे देत नाही. अजूनही महाराष्ट्राला केंद्राकडून 29 हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. अतिवृष्टीची मदत अजूनही दिलेली नाही. डिझेल-पेट्रोलच्या दरवाढीवर भाजप आंदोलन का करत नाही. 
विराट कोहलीची सेंच्युरी आम्ही पाहिली होती. पण, पेट्रोलची सेंच्युरी आम्ही पहिल्यांदाच अनुभवत आहोत, अशा शब्दांत वाढता इंधन दरवाढीवर केंद्राला टोला लगावाला. इंधनावर लावण्यात आलेल्या करामुळे केंद्राच्याच तुंबड्या भरणार आहेत. देश विकायला काढणारे म्हणून तुमचीही नोंद होईल याचे भान ठेवा, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला. 

जयंती की पुण्यतिथी? 

सावरकर यांची जयंती कि पुण्यतिथी याचा अभ्यास अगोदर विरोधी पक्षनेत्यांनी करावा. त्यानंतर आमच्यावर आरोप करावा. ज्यांना जयंती की पुण्यतिथी माहीत नाही, त्यांनी आमच्यावर आरोप करावा, हे हास्यास्पद आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com