शरद पवारांवर बोलणाऱ्यांची लायकी काय? : उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना फटकारले 

त्यांचं कुणीही सीरियसली घेत नाही.
Chief Minister Uddhav Thackeray criticizes Chandrakant Patil
Chief Minister Uddhav Thackeray criticizes Chandrakant Patil

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांच्याबद्दल मला बोलायचीसुद्धा गरज वाटत नाही. त्यांचं कुणीही सीरियसली घेत नाही. ऐकू पण नयेत, असली लोक आहेत ही. पवार मोठे नेते मान्यच. पण, त्यांच्यावर बोलणाऱ्यांची लायकी काय आहे?,  असा सवाल करत शरद पवारांवर टीका करणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फटकारले. 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ‘सामना’चे संपादक, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. त्यात शरद पवार यांच्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. 

पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारानिमित्त पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं. राजकारणात येण्यापूर्वी शरद पवार फार मोठे नेते वाटायचे. पण ते फार छोटे आहेत. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका त्यांनी केली होती. त्यावेळी राष्ट्रवादीने त्यांना योग्य शब्दांत उत्तर दिले होते. 

संजय राऊत यांनी याबाबत मुलाखतीत बोलताना शरद पवार हे देशातील, राज्यातील प्रमुख नेते आहेत. त्यांच्याविषयी भाजपचे नेते सांगताहेत की ते अत्यंत कमी उंचीचे नेते आहेत. त्यांची कुवतच नाही. ते लोकनेते नाहीत, असा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना ठाकरे म्हणाले की होय, ते प्रमुख नेते आहेत, त्यांना आता ८० वर्षे पूर्ण होत आहेत. पण, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांच्याबद्दल मला काही बोलायचीसुद्धा गरज वाटत नाही. त्यांचं कोणी सीरियसली घेत नाहीत. ऐकू पण नयेत, असली लोकं आहेत, ही. 

संजय राऊतांनी त्यांना पुढे विचारले की हा महाराष्ट्राचा आणि आपल्या नेत्यांचा अपमान आहे हा. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले की, मान्य. पण बोलणाऱ्यांची लायकी काय आहे? कोणी काहीही बोलेल आणि काहीही ऐकायचं. कशाला वेळ घालवतायत त्यात, अशा शब्दांत त्यांनी चंद्रकांत पाटील यांना अनुल्लेखाने मारले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com