चंद्रकांतदादा म्हणतात, "" चौथीतली पोरगी सांगेल महाआघाडी सरकारचं काही खरं नाही !''  - Chandrakantdada says, "The fourth Porgi Sangel Mahaghadi government has no truth!" | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांतदादा म्हणतात, "" चौथीतली पोरगी सांगेल महाआघाडी सरकारचं काही खरं नाही !'' 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 2 जुलै 2020

पाटील यांनी महाविकास आघाडी आणि ठाकरे सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, चौथीची पोरगी पण सांगेल की यांचे काही खरे नाही.

मुंबई : राज्यसरकारने आमच्याकडे मदत मागितली असती तर देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना संदर्भातील प्रश्न दोन दिवसात सोडवले असते, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला. 

पाटील यांनी महाविकास आघाडी आणि ठाकरे सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, चौथीची पोरगी पण सांगेल की यांचे काही खरे नाही. कोरोना संकटात देवेंद्र फडणवीसांकडे जरी दिवसाचे दोन तास मागितले असते, तर त्यांनी कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला इगो आडवा येतो. 
सरकारला लॉक की अनलॉक अजून कळत नाहीत. आपापले मतभेद आणि गोंधळ संपत नाहीत.लॉकडाऊनमध्ये ज्या बाबींवर कडक निर्बंध नव्हते. त्यापेक्षा जास्त गोंधळ अनलॉकमध्ये घालून ठेवला आहे. लोकांनी करायचे तरी काय, असा प्रश्न पाटील यांनी विचारला. 

मुंबईत एवढे मूर्खपणाचे निर्णय घेत आहेत की काही बोलायलाच नको. आजार राहिला बाजूला पण सामान्य माणूस मात्र वैतागला आहे. आम्ही काही बोललो की जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील लगेच बोलतात सत्तेची हाव लागलीय. तुमच्यात मतभेद आहेत हे आम्ही बोलायच नाही का ? चौथीची पोरगी पण सांगेल की यांचे काही खरे नाही, असे ते म्हणाले. 

मुख्यमंत्री किंवा सत्ताधाऱ्यांचा लोकांशी काहीच संबंध नाही. आम्ही सत्तेत असताना विरोधकांना तेव्हाही विचारात घेत होतो. एकट्या देवेंद्र फडणवीसांना जरी दिवसाचे दोन तास मागितले असते, तर त्यांनी कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला इगो आडवा येतो,

सत्तेची हाव इतकी होती की या खुर्चीला किती काटे आहेत ते आत्ता उद्धव ठाकरे यांना जाणवायला लागले आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादाचा फटका शिवसेनेला बसत असला, तरी सत्तेपायी तो त्यांना चालेलच. सत्तेची हाव मोठी आहे, अशी टीका चंद्रकांत पाटल यांनी केला. 

पंतप्रधान आढावा घेणार 
पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 तारखेला देशातील 7 राज्यांच्या कार्याचा आढावा घेणार आहेत, अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली. 
शरद पवारांची चीनबद्दलची भूमिका ही मोदींच्या समर्थनार्थ होती, मात्र ती कॉंग्रेसला कशी पटेल, त्यांच्यातल्या वादाचा फटका हा शिवसेनेला बसतोच आहे. पण सत्तेपायी त्यांना तो चालतोय, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख