'सीबीआय' अॅक्शन मोडवर; अनिल देशमुखांकडेही करणार चौकशी? - CBI Team arrived in Mumbai to Probe Parambir Singh Allegations | Politics Marathi News - Sarkarnama

'सीबीआय' अॅक्शन मोडवर; अनिल देशमुखांकडेही करणार चौकशी?

सूरज सावंत
मंगळवार, 6 एप्रिल 2021

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय अॅक्शन मोडवर आली आहे. या आरोपांच्या चौकशीसाठी दिल्लीचे सीबीआय पथक मुंबईत दाखल झाले आहे. लवकरचं चौकशीला होणार सुरूवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

नागपूर : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग (Parambirsingh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय (CBI) अॅक्शन मोडवर आली आहे. या आरोपांच्या चौकशीसाठी दिल्लीचे सीबीआय पथक मुंबईत दाखल झाले आहे. लवकरचं चौकशीला होणार सुरूवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. CBI Team arrived in Mumbai to Probe Parambir Singh Allegations

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग (Mumbai High Cour) यांच्या आरोपांबाबत प्राथमिक चौकशी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्राथमिक चौकशीत काही तथ्य आढळल्यास सीबीआय (CBI) गुन्हा दाखल करु शकते, असे न्यायालयाने सांगितले आहे. ही चौकशी येत्या पंधरा दिवसात करावयाची असल्याने हे दिवस आता देशमुख यांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. 

राज्य सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमबीरसिंग (Parambir Singh) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले होते. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) सचिन वाझेला (Sachin Waze) प्रत्येक महिन्याला १००  कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. अनिल देशमुखांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. मागील काही महिन्यांत वाझेंना गृहमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी अनेक वेळा बोलावले होते. या भेटींमध्ये ते वाझेंना (Sachin Waze) निधी गोळा करण्यासाठी सांगत, असे आरोप परमबीर सिंग यांनी या पत्रात केले होते. 

त्यामुळे आता सीबीआय प्राथमिक चौकशीसाठी कुणाकुणाला बोलावणार याची उत्सुकता आहे. परमबीरसिंग तक्रारदार असल्याने त्यांच्याकडे पुराव्यांबाबत चौकशी होऊ शकते. परमबीरसिंग यांनी आपल्या तक्रारीत सचिन वाझेचा उल्लेख केला आहे. त्यामुळे सध्या एनआयएच्या (NIA) ताब्यात असलेल्या सचिन वाझेकडेही चौकशी होऊ शकते. तसेच ज्यांच्यावर हे आरोप आहेत, त्या अनिल देशमुखांकडेही सीबीआय चौकशी करु शकते. CBI Team arrived in Mumbai to Probe Parambir Singh Allegations

दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी काल रात्री उशिरा ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सकाळी सुप्रीम कोर्टात इ फायलिंग द्वारा याचिका दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, अनिल देशमुखांवर परमबीरसिंग यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. लवकरच या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख