अयोध्येत बुद्धविहार उभारणार: रामदास आठवले  - Buddha Vihar to be set up in Ayodhya: Ramdas Athavale | Politics Marathi News - Sarkarnama

 अयोध्येत बुद्धविहार उभारणार: रामदास आठवले 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 30 जुलै 2020

अयोध्येत वादग्रस्त जागी राम मंदिराचे तसेच बुद्ध विहाराचे ही अवशेष सापडत आहेत हे सत्य आहे.

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारकडून अयोध्येत बुद्ध विहारासाठी जागा मिळविण्याचा तसेच ट्रस्ट उभारून जागा मिळवून तेथे बुद्ध विहार उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. अयोध्येत बुद्ध विहार उभारावे अशी मागणी मागील 10 वर्षांपासून करीत आहोत असे माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिली. 

अयोध्येत राम मंदिर, मशीद आणि बुद्ध विहार उभारून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधनातील सर्व धर्म समभावाचा संदेश जगाला द्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

2 हजार 500 वर्षांपूर्वी भारत संपूर्ण बौद्ध राष्ट्र होते. अयोध्येत वादग्रस्त जागी राम मंदिराचे तसेच बुद्ध विहाराचे ही अवशेष सापडत आहेत हे सत्य आहे. बाबरी मस्जिद उभारण्याआधी तेथे राम मंदिर होते. हे सत्य आहे तसेच राम मंदिर उभारण्या आधी तेथे बुद्ध विहार होते हेही सत्य आहे. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत केले असून वाद मिटला आहे. मात्र अयोध्येत बुद्ध विहार ही उभारले पाहिजे अशी आमची मागणी असून त्यासाठी देशभररतील बौद्ध जनतेचे सहकार्य घेऊन ट्रस्ट उभारून अयोध्येत भव्य बुद्ध विहार उभारण्याचा माझा प्रयत्न असल्याचे आठवले यांनी आज पत्रकात म्हटले आहे. 

दुकाने सुरू ठेवण्याबाबत गोंधळ!

मुंबईतील दुकाने एक दिवसाआड सुरू राहणार की दररोज सुरू राहणार? याबाबत गोंधळ निर्माण झाला असून, राज्य सरकारने यासंदर्भात स्पष्टीकरण करावे, अशी मागणी किरकोळ विक्रेता संघटनेकडून (फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स असोसिएशन) करण्यात आली आहे. एक दिवसाआड दुकाने सुरू ठेवण्याऐवजी ती दररोज सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, असेही व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे. संघटनेचे अध्यक्ष विरेन शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इक्‍बालसिंह चहल यांच्याकडे ई-मेलद्वारे ही मागणी केली आहे. 

सद्यस्थितीत मुंबईत रस्त्यांवरील एका बाजूची दुकाने एका दिवशी, तर दुसऱ्या बाजूची दुकाने दुसऱ्या दिवशी अशी एक दिवसाआड सुरू असतात. 29 जुलै रोजी सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्‍स, दुकाने ही पाच ऑगस्टपासून सकाळी नऊ ते रात्री सात या वेळेत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, दुकानांबाबतची आधीची अधिसूचनाही अमलात राहील, असेही त्यात म्हटले आहे. 

रस्त्याच्या दोन्ही बाजूची दुकाने एक दिवसाआड सुरू ठेवण्याचा उल्लेख त्या आधीच्या अधिसूचनेतही आहे. अशा स्थितीत सर्व दुकाने रोज खुली ठेवावीत की एक दिवसाआड सुरू ठेवावी. याबाबत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याऐवजी सर्व दुकाने दररोज उघडण्याची परवानगी द्यावी, असेही शहा यांनी या आपल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख