आमदार निवासात बाँब ठेवल्याची अफवा - Bomb Rumour in Akashwani MLA Hostel Mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार निवासात बाँब ठेवल्याची अफवा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

येथील आकाशवाणी आमदार निवासात बाँब ठेवल्याचा दूरध्वनी अज्ञात व्यक्तीने केल्यानंतर पोलिसांसह सर्वांची तारांबळ उडाली. मध्यरात्री हा फोन आला होता. त्यानंतर आमदार निवासातील सुमारे दीडशे जणांना बाहेर काढण्यात आले व सर्व खोल्यांची तपासणीही करण्यात आली. 

मुंबई : येथील आकाशवाणी आमदार निवासात बाँब ठेवल्याचा दूरध्वनी अज्ञात व्यक्तीने केल्यानंतर पोलिसांसह सर्वांची तारांबळ उडाली. मध्यरात्री हा फोन आला होता. त्यानंतर आमदार निवासातील सुमारे दीडशे जणांना बाहेर काढण्यात आले व सर्व खोल्यांची तपासणीही करण्यात आली. 

सोमवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीनं फोन करून आमदार निवास बॉम्बने उडवून देणार असं सांगितलं. त्यानंतर आमदार निवासातील कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी रात्रभर बॉम्ब शोध पथकाच्या मदतीने बॉम्बचा शोध घेतला. मात्र कोणत्याही प्रकारची स्फोटके आढळली नाहीत. आता पोलिस फोन करून धमकी देणाऱ्याचा शोध घेतला जात असून लवकरच कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं.

दरम्यान, निनावी फोन आल्यानंतर आमदार निवासातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. जवळपास 150 लोकांना बाहेर काढल्यानंतर प्रत्येक खोलीची कसून तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आमदार निवासापासून 50 मीटर अंतरापर्यंत बॅरिकेटही लावण्यात आले. 

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख