आघाडी सरकार आल्यानंतर हिंदू धर्माचा अपमान वाढला... - BJP Upset over Sharjil Usmani's Remarks on Hindu Religion | Politics Marathi News - Sarkarnama

आघाडी सरकार आल्यानंतर हिंदू धर्माचा अपमान वाढला...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

अलीगढ़ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी  शरजील उस्मानी याने हिंदू धर्माबद्दल काढलेल्या अनुदार उद्गारांनी भाजप चांगलाच संतापला असून आता त्याच्या मागे पोलिस तक्रारींचा ससेमिरा लावण्याचा विचार भाजपने केला आहे.

मुंबई : अलीगढ़ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी  शरजील उस्मानी याने हिंदू धर्माबद्दल काढलेल्या अनुदार उद्गारांनी भाजप चांगलाच संतापला असून आता त्याच्या मागे पोलिस तक्रारींचा ससेमिरा लावण्याचा विचार भाजपने केला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात आघाडी सरकार आल्यापासून हिंदू धर्माचा अपमान होत असल्याचा आरोप भाजपचे आमदार राम कदम यांनी केला आहे.

आजचा हिंदू समाज सडलेला, आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लिम आहात हे कारण पुरेसे आहे, असं वक्तव्य विद्यार्थी नेता म्हणून चर्चेत असलेल्या शरजील उस्मानी याने पुण्यात नुकत्याच झालेल्या एल्गार परिषदेत केले होते. त्याच्या या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. त्याबाबत राम कदम यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात जेव्हा पासून महाविकास आघाडी सरकार आलेल आहे तेव्हा पासून हिंदू धर्माचा अपमान होत आहे गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या एल्गार परीषदेमध्ये हिंदू धर्मांविषयी अपमानजनक वक्तव्य केली जात आहेमहाराष्ट्र सरकार जाणीव पूर्णक या विषयाकडे कानाडोळा करून पाहत आहे कोणतीही कारवाई करत नाही.

दरम्यान,  भाजयुमोच्या वतीने शरजील उस्मानीच्या विरोधात पोलिस महासंचालकांकडे तक्रार करण्यात आली आहे. आज शलजीर उस्मानी यांच्या विरोधात मी पोलिस महासंचालक यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे."एल्गार परीषद समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे.महाराष्ट्र सरकारने एल्गार परीषदेला परवानगी दिली कशी ? 
मागील दोन वर्षांपूर्वी अशीच परवानगी देण्यात आली होती तेव्हा दंगल उसळली होती. २०१७ ला जी घटना त्यामुळे भीमा कोरेगाव घटना घडली या महाराष्ट्राने पाहीले. एल्गार च्या व्यासपिठावरून त्यांचे नेते जाणीवपूर्वक अशी वक्तव्य केली जातात. शरजील उस्मानी आणि अरूण बनकर यांच्या विरोधात आम्ही राज्यभर एफआयआर दाखल करणार आहोत,"  असे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सांगितले. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख