आंदोलनापूर्वीच राम कदम यांना पोलिसांनी घेतले ताब्यात (व्हिडिओ) - BJP Mla Ram Kadam Detained Before proceeding for agitation | Politics Marathi News - Sarkarnama

आंदोलनापूर्वीच राम कदम यांना पोलिसांनी घेतले ताब्यात (व्हिडिओ)

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

पालघर येथील साधू हत्याकांड प्रकरणात जनआक्रोश आंदोलनासाठी निघालेले भाजपचे आमदार राम कदम यांना सकाळी पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाच्याबाहेरून ताब्यात घेतले. राम कदम आंदोलनासाठी जाणार असल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला होता

मुंबई : पालघर येथील साधू हत्याकांड प्रकरणात जनआक्रोश आंदोलनासाठी निघालेले भाजपचे आमदार राम कदम यांना सकाळी पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाच्याबाहेरून ताब्यात घेतले. राम कदम आंदोलनासाठी जाणार असल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला होता. यावेळी कदम यांच्या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. 

पालघर हत्याकांड प्रकरणाला २११ दिवस उलटल्यानंतरही कोणतीही कारवाई न करण्यात आल्याचा निषेध म्हणून हे ‘जनआक्रोश’ आंदोलन करण्यात येत होते. राम कदम यांनी बुधवारी सकाळी ८.३० वाजता आपल्या निवासस्थापासून निघून पालघरमधील हत्याकांड घटनास्थळापर्यंत जाऊन आंदोलन करणार होते. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी कदम यांनी यापूर्वीचे केली आहे. आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. पालघर हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी राम कदम यांनी केली आहे. याबाबत कदम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया राम कदम यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

सरकार च्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राम कदम यांना ताब्यात पोलिसांनी घेतले असून महाराष्ट्रात जुलमी राजवट असल्याच आपल्याला पाहायला मिळतंय, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली. आंदोलनच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून राम कदम यांच्या निवासस्थानबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले होते. त्यामुळे पोलिसांचा देखील मोठ्याप्रमाणात फौजफाटा तैनात केला होता. या आंदोलनामुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे कदम यांच्यावर कारवाई केल्याचा दावा पोलिसांनी केला. 
Edited By - Amit Golwalkar 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख