गिरीश महाजन, प्रवीण दरेकरांना आताच गाडीत टाका; शिवबंधन बांधूया!

एकीकडे हे टिकेचे सूर असताना भाजप आणि शिवसेना नेत्यांमधील खेळीमेळीहीदिसून आली.
BJP leaders interacted with the Chief Minister in the Vidhan Bhavan premises
BJP leaders interacted with the Chief Minister in the Vidhan Bhavan premises

मुंबई : भारतीय जनता पक्षासोबत असलेली कटुता कमी करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत असल्याची चर्चा राज्यात रंगली असतानाच आज या दोन्ही पक्षांतील सौहार्दाचे  संबंध पुन्हा बघायला मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनातून निघत असताना प्रवीण दरेकर, गिरीश महाजन आणि प्रसाद लाड यांनी गाडी थांबवून त्यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी ‘यांना आताच गाडीत टाका, शिबबंधन बांधूया,’ असे म्हटले. त्यावर दरेकर यांनी ‘आम्ही केव्हाही एकत्र येऊ शकतो’, असे उत्तर दिले. (BJP leaders interacted with the Chief Minister in the Vidhan Bhavan premises)

विधीमंडळ कामकाज समितीची आज (ता. २२ जून) बैठक होती. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर नेतेमंडळी विधानभवनात आले होते. विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे घेण्याचा निर्णय या समितीच्या बैठकीतच झाला. त्यावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांकडून सरकारवर टिकेची झोड उठवली जात आहे. एकीकडे हे टिकेचे सूर असताना भाजप आणि शिवसेना नेत्यांमधील खेळीमेळीही दिसून आली.

विधीमंडळ कामकाज समितीची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः गाडी चालवत विधान भवनातून निघाले असता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार प्रसाद लाड यांनी गाडी थांबवून त्यांची भेट घेतली. प्रथम प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे निघाले असता गिरीश महाजन लगबगीने पुढे येत त्यांच्याशी बोलले. त्याचवेळी मागच्या गाडीतून मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर खाली उतरले आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ आले. त्यावेळी या नेत्यांमध्ये रंगलेला संवाद....

मिलिंद नार्वेकर : उद्धव साहेब, यांनी तुम्हाला घरेण्याचा प्रयत्न केला आहे का?

प्रवीण दरेकर : आम्ही केव्हाही जवळ येऊ शकतो.

मिलिंद नार्वेकर : यांना आताच गाडीत टाका, शिबबंधन बांधूया. 

प्रवीण दरेकर : आम्ही केव्हाही एकत्र येऊ शकतो, हे आमचं मूळ आहे.

दरम्यान, विधानसभा निकालानंतर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांत निर्माण झालेली कमालीची कटुता हळूहळू कमी होताना दिसत आहे. त्याचे प्रतिबिंब आज (ता. २२ जून) विधानभवन परिसरात झालेल्या या भेटीतील संवादातून दिसून आले. खरे तर ही चर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत झालेल्या भेटीपासून सुरू झाली होती. गेली दीड वर्षे कमालीचे ताणलेले संबंध असतानाही मुख्यमंत्री ठाकरे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राजभवनावर गेले होते. 

एकीकडे या दोन भेटींची राज्यात चर्चा सुरू असतानाच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र पुढे आले. त्यात त्यांनी भाजपशी जुळवून घेण्याची विनंतीच शिवसेना पक्षप्रमुखांना केली गेली. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना आणि भाजप एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडून संजय राऊत यांनी त्याचा इन्कार केला असला तरी भाजप नेत्यांकडून मात्र हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेसोबत युती होऊ शकते, असे दाखले दिले जात आहेत. त्यातच काँग्रेस पक्षाच्या स्वबळाच्या भूमिकेमुळे त्याला आणखी हवा मिळत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com