भाजप नेते सत्तेसाठी वेडेपिसे : सचिन सावंत

भाजपशासित राज्यांत तेथील सरकारांनी कोरोनासमोर लोटांगण घातले आहे.
भाजप नेते सत्तेसाठी वेडेपिसे : सचिन सावंत

मुंबई : भाजपशासित राज्यांतील कोरोनाची रुग्णसंख्या दडवली जात असून, गुजरातमध्ये तर रुग्णांच्या चाचण्याच केल्या जात नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. 

उच्च न्यायालयानेच गुजरातमधील आरोग्य यंत्रणेची पोलखोल करत तेथील रुग्णालये ही अंधारकोठडीपेक्षा भयानक असून गुजरातची तुलना बुडत्या टायटॅनिक जहाजाशी केली आहे. त्यामुळे भाजपच्या राज्यातील नेत्यांनी गुजरात मॉडेलच्या चंद्राला पडलेली विवरे आधी पाहावीत. त्यानंतर राज्यातील सरकारबद्दल बोलावे, असा इशारा कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना दिला आहे.

गुजरातमध्ये चाचण्याच केल्या जात नाहीत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्येही तीच परिस्थिती आहे. भाजपशासित राज्यांत तेथील सरकारांनी कोरोनासमोर लोटांगण घातले आहे. 2011 च्या जनगणनेच्या आधारावर अहमदाबादची लोकसंख्या 55.7 लक्ष आहे.

 हे पाहता 70 टक्के रुग्ण म्हणजे कमाल 55 लाख; तर किमान 40 लाख कोरोना रुग्ण आहेत असे म्हणावे लागेल आणि निश्‍चितच हे आकडे दडवले जात आहेत. भाजपशासित राज्यात अत्यंत वाईट परिस्थिती असून, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटकची परिस्थीतीही याहून वेगळी नाही. भाजपशासित राज्यांतील ही परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील परिस्थितीवर बोलण्याचा राज्यातील भाजप नेत्यांना नैतिक अधिकार नाही. 

राज्य एका मोठ्या संकटाला सामोरे जात असताना जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याऐवजी राज्य अस्थिर करण्याचा डाव रचला जात आहे. नारायण राणे, सुब्रह्मण्यम स्वामी यांची राष्ट्रपती राजवट लावण्याची विधाने काही अचानक आलेली नाहीत; तर त्यांना केंद्रातील भाजप नेतृत्वाची फूस आहे, असेही सावंत यांनी या वेळी सांगितले.

कोव्हिड वॉर्डमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू
 केईएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कोव्हिड वॉर्डमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले आहे.

रुग्णालय प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही सुविधा दिली जात नसल्याने अधिष्ठाता हेमंत देशमुख यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. कर्मचारी काम करीत नाहीत, असे विधान देशमुख यांनी केल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. याचविरोधात हे काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
सर्व संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन सुरू केले आहे. 

सकाळी 9.30 वाजल्यापासून हे आंदोलन करण्यात आले आहे. आतापर्यंत कोव्हिड रुग्णांचे मृतदेह ताब्यात घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सुविधा किंवा पीपीई किटस पुरवले गेले नाहीत असा आरोप करत आतापर्यंत सात शवागारांत काम करणारे कर्मचारीही पॉझिटिव्ह आल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com