आमच्या आदित्य ठाकरेंचे नाक कापू नका! - BJP leader Prasad Lad criticizes Aditya Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

आमच्या आदित्य ठाकरेंचे नाक कापू नका!

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 27 एप्रिल 2021

राज्यातील नागरिकांना कोविडची मोफत लस देण्याच्या श्रेयासाठी महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे.

मुंबई : राज्यातील नागरिकांना कोविडची मोफत लस देण्याच्या श्रेयासाठी महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी याबाबतची घोषणा करताच युवा सेनेचे प्रमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्याबाबतचे ट्विट केले हेाते. मात्र, काही वेळातच ते ट्विट डिलिट केले. त्यावरून भारतीय जनता पक्षाचे नेते प्रसाद लाड आदित्य यांना लक्ष्य केले आहे. ट्विट डिलिट करणार्‍या आमच्या आदित्य ठाकरेंचे नाक कापू नका, असा टोकाल लाड यांनी लगावला आहे.

हे ही वाचा : मोफत लसीकरणाबाबतची विधाने म्हणजे महाआघाडीतील नेत्यांचा बोलघेवडेपणा

या संदर्भात प्रसाद लाड यांनी ट्वीट केले आहे. ते म्हणाले की ''परवडतं त्यांच्याकडून पैसे घेऊ: राजेश टोपे, लसीकरण फुकट करू: नबाव मलिक श्रेय लाटू नका : बाळासाहेब थोरात एकच विनंती आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनो भांडा. पण, ट्विट डिलिट करणार्‍या आमच्या आदित्य ठाकरेंचे नाक कापू नका,'' अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा समाचार घेतला आहे.  

दरम्यान, राज्यात लसीचा तुटवडा असताना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यातील सर्व नागरिकांना १ मे पासून मोफत लस देण्यात येणार आहे, त्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळात चर्चा झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी तातडीने ट्विट करत राज्यातील नागरिकांना आम्ही आमचे कर्तव्य म्हणून मोफत लस देणार आहोत, असे म्हटले होते. मात्र, काही वेळानंतरच त्यांनी आपले ट्विट डिलिट केले होते. त्यावरून आदित्य ठाकरे यांच्यावर भापजच्या नेत्यांनी निशाणा साधला आहे.

बाळासाहेब थोरात काय म्हणाले होते?

राज्यामध्ये मोफत लसीकरणाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर करण्याआधीच त्याचे श्रेय घेणे योग्य नाही. अशा प्रकारच्या श्रेय घेण्याच्या प्रकारावर काँग्रेसची नाराजी आहे, असे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले होते.

हे ही वाचा : परमवीरसिंग यांच्यावर 'लेटर बॅाम्ब' : हजारो कोटींची माया जमविल्याचा यादीसह आरोप
 

मोफत लसीकरणाबाबतची आमची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी मोफत लसीकरण करण्याचा आग्रह धरला आहे. नागरिकांना कोरोना लस मोफत द्यावी अशी आमची आग्रही मागणी आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तसी मागणी केली असून ती मान्य होईल, अशी आशा आहे, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केली होती.
Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख