एक नारी शिवसेना पर भारी : अतुल भातखळकरांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली - BJP Leader Atul Bhatkhalkar Criticism on Sanjay Raut and Shivsena | Politics Marathi News - Sarkarnama

एक नारी शिवसेना पर भारी : अतुल भातखळकरांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

शिवसेनेच्या तोंडाळ नेत्यांना उघड आव्हान दिलंय या महिलेने. जिने बॉलीवूडच्या इस्लामी माफियांना भीक घातली नाही, ती नवं बाटग्या सेक्युलर शिवसेने समोर झुकेल काय? दाऊदला दम देण्याच्या बाता मारणारे आपले शौर्य एका बाईला दाखवतायत, असे म्हणत अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे

पुणे : एक नारी शिवसेना पर भारी...असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेना व विशेषतः खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्मीरशी केल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर आता राजकीय विवाद सुरु झाले आहेत. 

शिवसेनेच्या तोंडाळ नेत्यांना उघड आव्हान दिलंय या महिलेने. जिने बॉलीवूडच्या इस्लामी माफियांना भीक घातली नाही, ती नवं बाटग्या सेक्युलर शिवसेने समोर झुकेल काय? दाऊदला दम देण्याच्या बाता मारणारे आपले शौर्य एका बाईला दाखवतायत, असेही भातखळकर यांनी म्हटले आहे. कंगनाने केलेल्या वक्तव्यानंतर तिने मुंबईत येऊ नये, असे राऊत म्हणाले होते. तर शिवसेनेच्या आणखी काही नेत्यांनी शेलक्या शब्दात कंगनावर टीका केली होती. 

त्यानंतर आक्रमक होत कंगनाने आपण येत्या ९ तारखेला मुंबईत येत आहोत. मला अडवण्याची हिंमत करुन दाखवा असे आव्हान दिले. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि माझ्या देशात कुठेही जाण्याचा अधिकार आहे, असेही कंगनाने राऊत यांना सुनावले होते. त्यानंतर भातखळकर यांनी ट्वीट करत शिवसेनेची खिल्ली उडवली. 

खानावळी विरुद्ध लढणाऱ्या कंगनाचा विचार तूर्तास सोडा, 'अटक झालीत तर गॉड फादरना सोडणार नाही', अशी अशी धमकी रियाने दिली आहे, त्याचा गंभीरपणे विचार करा.  बुडाला आग लागलेली असताना, दुसऱ्याच्या घराला आग लावण्याचा विचार करणे शहाणपणा नाही, असा सल्लाही भातखळकर यांनी दिला आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख