राम मंदिर आंदोलनात शिवसेनेची घुसखोरी..आता खूपतेय "रामवर्गणी" - bjp leader Ashish shelar slams shivsena on ram mandir   | Politics Marathi News - Sarkarnama

राम मंदिर आंदोलनात शिवसेनेची घुसखोरी..आता खूपतेय "रामवर्गणी"

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 21 डिसेंबर 2020

मुंबई पालिका कंत्राटदारांच्या मर्जीने चालवणाऱ्यांना स्वतःच्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे,' असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. 

मुंबई : 'अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे ? मुळात श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकविण्यासाठी बांधले जात आहे. निवडणूक प्रचारात राम नको, फक्त विकास असायला हवा. पण तसे दिसत नाही. वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरूच आहे,' अशी टीका आजच्या 'सामना'च्या संपादकीयमधून भाजपवर करण्यात आली आहे. 

भाजपचे नेते निलेश राणे यांच्यानंतर आता भाजचे नेते आशिष शेलार यांनी या टीकेच्या समाचार घेतला आहे. शेलार यांनी अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? यावरून शिवसेनेवर धारेवर धरलं आहे. 'मुंबई पालिका कंत्राटदारांच्या मर्जीने चालवणाऱ्यांना स्वतःच्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे,' असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. 

"या आंदोलनात ज्यांची केवळ होती राजकीय घुसखोरी, त्यांनाच झाली होती राम मंदिराच्या भूमी पुजनाची पोटदुखी..आणि त्यांनाच आता डोळ्यात खूपतेय "रामवर्गणी" राम भक्त हो! मुंबई पालिका कंत्राटदारांच्या मर्जीने चालवणाऱ्यांना स्वतःच्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे" असं टि्वट आशिष शेलार यांनी केलं आहे.  

आशिष शेलार म्हणतात की राम जन्मभूमी आंदोलन म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद. अशोक सिंघल, मोरोपंत पिंगळे, साध्वी ऋतंभरा, उमा भारती, महंत रामचंद्र परमहंस यांच्यासह कोठारी बंधु आणि असंख्य कारसेवक यांच्या संघर्षांचं अन् समर्पित आयुष्याचं हे आंदोलन आहे.  

ज्यांचं घर वर्गणीतून चालतं तेच विचारतात मंदिर वर्गणीतून बांधणार काय..  अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे?, असा प्रश्न आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात विचारण्यात आला आहे. श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकवण्यासाठी बांधले जात आहे, असा टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे. यावर भाजचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. याबाबत निलेश राणे यांनी टि्वट केलं आहे. आपल्या टि्वटमध्ये निलेश राणे म्हणतात, "लाज सोडली शिवसेनेने...शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आयुष्य भर फक्त वापर केला. ज्यांचं घर वर्गणीतून चालतं तेच विचारतात मंदिर वर्गणीतून बांधणार काय. जनाची नाही पण किमान मनाची तर ठेवा."

अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? मुळात श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकविण्यासाठी बांधले जात आहे.  निवडणूक प्रचारात राम नको, फक्त विकास असायला हवा. पण तसे दिसत नाही. वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरूच आहे, अशी टीका आजच्या सामनाच्या संपादकीय मधून भाजपवर करण्यात आली आहे. 

(Edited  by : Mangesh Mahale) 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख